गावात क्रिकेट खेळताना चेंडू गुप्तांगाला लागल्याने तरुणाचा गेला जीव; परिसरात खळबळ

पंढरपूर : गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रम क्षीरसागर (३५) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत विक्रम क्षीरसागर हा ३५ वर्षीय खेळाडू नेपातगाव या टीमकडून बॅटिंग करत होता. समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला आणि तो मैदानातच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या गोष्टी खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होत असतात. या पार्श्वभूमीवर तरुणांनी आपला जीव वाचवण्यासाठी क्रिकेट स्पर्धांमध्ये योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचं पंढरपूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Leave a Comment

Home
माझा व्यवसाय
बातमी
छोट्या जाहिराती