नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला 2027 मध्ये वेगळे होतील:ज्योतिषाच्या भविष्यवाणीने खळबळ, मागील लग्न मोडल्याने चाहते नाराज
साउथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा माजी पती नागा चैतन्यने अलीकडेच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत एंगेजमेंट केली आहे. दरम्यान, एका ज्योतिषाने त्यांच्याबाबत भाकीत केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या महिलेमुळे नागा चैतन्य शोभितापासून वेगळा होईल, असा अंदाज ज्योतिषाने वर्तवला आहे. गेल्या एक वर्षापासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा होत्या. हे कपल नुकतेच त्यांच्या एंगेजमेंटनंतर चर्चेत आहे. दरम्यान, एका ज्योतिषाने काही वर्षांत त्यांचे विभक्त होण्याची भविष्यवाणी केली. हे भाकीत ज्योतिषाला महागात पडले असून तो कायदेशीर अडचणीत अडकला आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचे चाहते त्यांच्या एंगेजमेंटनंतर त्यांना प्रचंड प्रेम देत आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूसोबत नागाच्या आधीच्या तुटलेल्या लग्नावरही काही लोक नाराज आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका ज्योतिषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या नात्याबद्दल भाकीत केले आहे की ते 2027 मध्ये कधीतरी दुसऱ्या महिलेमुळे वेगळे होतील. ज्योतिषी वेणू स्वामी काही वेळातच त्यांच्या वादग्रस्त अंदाजांमुळे प्रसिद्धीझोतात आले. तेलुगू फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनने ज्योतिषीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. त्यानंतर ज्योतिषाने स्पष्ट केले की त्याने केलेले भाकीत चैतन्य आणि त्याची माजी पत्नी सामंथा रुथ प्रभू यांच्यात घडलेल्या गोष्टींचा विस्तार होता. वेणूने जोर दिला की आतापासून तो चित्रपट तारे आणि राजकारण्यांसाठी भविष्य वर्तवणार नाही.