भारत आणि वेस्ट इंडिजचा चौथा सामनाही का उशिराने सुरु होणार, जाणून घ्या खरं कारण….

फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये चौथा ट्वेन्टी-२० सामना अजूनही सुरु झाला नाही. या सामन्याचा टॉस ७.३० वाजता होणार होता आणि सामना रात्री ८.०० वाजता सुरु होणार होता. पण अजूनही हा सामना सुरु झालेला नसून त्याचे मोठे कारण आता समोर आले आहे.

भारताचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा खेळाडूंच्या बॅग्स उशिरा आल्यामुळे तीन तास उशिराने सुरु झाला होता. त्यानंतर तिसरा सामनाही दीड तास उशिराने सुरु करण्यात आला होता. आता हा चौथा सामनाही उशिरा सुरु होत आहे. सध्याच्या घडीला येथे पाऊस सुरु आहे. त्यामुळे हा चौथा सामना उशिरा सुरु होणार असल्याचे आता समोर आले आहे. पण लवकरच हा सामना सुरु होईल, अशी सर्वांना आशा आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे या दौऱ्याचे यजमान हे वेस्ट इंडिज आहेत. भारतीय संघत वेस्ट इंडिजमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळला आहे. त्यानंतर पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पण या मालिकेतील तीन ट्वेन्टी-२० सामने हे वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आले. त्यानंतर आता उर्वरीत दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी दोन्ही संघांनी अमेरिका गाठले आहे. आता ६ आणि ७ ऑगस्ट या कालावधीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन ट्वेन्टी-२० सामने फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येणार आहेत.

अमेरिकेचा संघ कोणत्याही वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत आपल्याला दिसलेला नाही. सध्याच्या घडीला अमेरिकेत क्रिकेटचा संघ बांधला जात आहे. त्यामुळे अमेरिकेत जेवढा क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार होईल, तेवढे खेळासाठी उपयुक्त ठरणार आहे. अमेरिकेत क्रिकेट हा खेळ वाढावा. तेथील लोकांना या खेळात जास्त रस निर्माण व्हावा, हा यामागील खरा हेतू आहे. जगभरात भारतीय चाहत्यांची कमतरता नाही. अमेरिकेतही भारताचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यामुळे जर भारताचा सामना अमेरिकेत खेळवला गेला तर त्याला जास्त प्रसिद्धी मिळेल आणि या खेळाकडे जास्त लोकं वळू शकतील. त्यामुळेच वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने हे दोन सामने अमेरिकेत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या मालिकेतील दोन्ही सामने अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत.
भारताचा कर्णधार रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे या सामन्यात टॉसला कोण येतो, याकडे सर्वांचे डोळे लागले होते.

Leave a Comment

Home
माझा व्यवसाय
बातमी
छोट्या जाहिराती