चर्चा तर होणारच!:काटोलमधून अनिल देशमुख यांनी भरला उमेदवारी अर्ज

काटोल विधानसभा मतदारसंघ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामुळे राज्यात चर्चेत असतो. या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र यामुळे त्यांच्याकडे गृहकलह सुरू झाला. कारण मुलगा सलील याला लढायचे होते. अखेर सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्यांच्या यादीत सलील सोबत अनिल देशमुखांचेही नाव पाहून अनेकांच्या भुवया उचांवल्या… माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नावाशी साधर्म्य असलेले अनिल शंकराव देशमुख हे नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हा नामांकन अर्ज भरण्यात आला असून तो मान्यही झाला आहे…नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ऐनवेळी येथे अनिल देशमुख यांचे पूत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावार उमेदवारी दाखल केली. तेच भाजपकडून चरण सिंग ठाकूर यांना भाजपची उमेदवारी मिळाली. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अनिल देशमुख नावाचा साधर्म्य असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याने सगळ्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

Share

-