घरातील स्वयंपाकघरातील मुग्यांनी आहात त्रस्त? मग कोणतंही केमिकल न वापरता असं लावा पळवून

 

Home remedies for Ants Free Home : मुंग्यांपासून मुक्ती कशी मिळवायची चला जाणून घेऊया. खरं तर मुंग्या हा काही मोठा किंवा त्रासदायक प्राणी वगैरे नाहीये पण तरीही खाण्याच्या वस्तूंना लागलेल्या मुंग्यांमुळे पदार्थ वाया जाऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी येथे काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय अत्यंत सोपे आणि किफायतशीर आहेत. मुंग्यांपासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी खडू, मीठ, काळी मिरी, दालचिनी आणि यासारखे बरेच पदार्थ मोलाची भूमिका निभावतात.

​खडू

मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे खडू होय. खडूमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते जे मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करते. घरात मुंग्या झालेल्या भागात खडूची थोडी भुकटी किंवा पावडर टाका किंवा प्रवेशद्वारावर खडूची रेषा काढा.

​लिंबू

लिंबू पिळून घ्या किंवा ज्या ठिकाणी मुंग्या आल्यात त्या ठिकाणी लिंबाची साल ठेवा. घरातील लादी लिंबाचा रस मिसळलेल्या पाण्याने देखील पुसू शकता. मुंग्यांना लिंबाच्या रसाचा वास आवडत नाही म्हणून त्या यापासून दूर राहतात.

​संत्री

संत्री हे सुद्धा लिंबूवर्गीय फळच आहे. एक कप कोमट पाण्यात काही संत्र्याच्या सालींची पावडर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट मुंग्या लागलेल्या जागी लावा आणि नंतर पुसून टाका. तुम्ही स्वयंपाकघरातील स्लॅबवर किंवा जिथून या मुंग्या आत येऊ शकतात असे तुम्हाला वाटत असेल तेथे संत्र्याच्या साली देखील ठेवू शकता.

​मिरपूड

मुंग्यांना साखर खूप आवडते पण त्यांना मिरपूड आवडत नाही. ज्या ठिकाणाहून मुंग्या येत आहेत त्या ठिकाणी मिरपूडची पावडर ठेवा. या उपायामुळे नक्कीच मुंग्यांपासून सुटका होईल.

​मीठ

मुंग्या घरात प्रवेश करतात अशा कोपऱ्यांजवळ मीठ पसरवल्यास मुंग्या नष्ट होतात. मुंग्यांपासून नैसर्गिकरित्या मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम आणि स्वस्त मार्ग म्हणजे मीठ. पण यासाठी सैंधव मीठ नव्हे तर सामान्य मीठच वापरा. फक्त पाणी उकळून घ्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात मीठ घाला. मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ढवळत राहा. एका स्प्रे बाटलीमध्ये हे पाणी घ्या आणि जिथे मुंग्या प्रवेश करतात असे तुम्हाला वाटते तिथे या पाण्याची फवारणी करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published.