BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच:किंमत ₹4.50 लाख पासून सुरू, पूर्ण चार्ज केल्यावर 108 किमी रेंज

BMW Motorrad India ने आज (1 ऑक्टोबर) भारतीय बाजारपेठेत प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 02 लाँच केली आहे. पूर्ण चार्ज केल्यावर 108 किलोमीटर चालते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने ई-स्कूटरची किंमत 4.50 लाख रुपये ठेवली आहे. ही कंपनीची भारतातील दुसरी प्रीमियम इलेक्ट्रिक दुचाकी आहे. या वर्षी जुलैमध्ये, कंपनीने आपली सुपर प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE 04 लाँच केली ज्याची रेंज 130km आहे, जी भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

Share

-