बोदवड तालुक्यात आजपासून पशुगणना सुरू:गोशाळेमधील दीडशेवर जनावरांना टोचले टॅग, बोदवड पशुसंवर्धन विभागामार्फत राबवले जातेय अभियान

पशुसंवर्धन विभागामार्फत दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. पशुगणनेत १६ प्रजातींच्या पशुधन व कुकुुट पक्षी व्यापक गणना होणार आहे. पशुगणना शुभारंभप्रसंगी गोशाळेतील १५० जनावरांना टॅग टोचण्यात आली. या अभियानात तालुकाभरातील गुरांची गणना केली जाणार आहे. बोदवड तालुक्यात गौरक्षण संस्थेत पशुगणनेस सुरुवात करताना गटविकास अधिकारी रमेश सपकाळे, पशुधन विकास अधिकारी डॉ.दीपक साखरे, डॉ.वर्षा पांचाळ, डॉ.नीलकंठ पाचपांडे, डॉ.निलेश बावस्कर उपस्थित होते. पशु गणना करताना जनावरांच्या कानाला बिल्ला मारणे बंधनकारक आहे. या कामासाठी पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पात्रताधारकांची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होणार असून त्यानुसारच जनावरांसाठी योजना आखल्या जाणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील पशुधनाची संख्या लक्षात घेत लसीकरणासाठी औषधी पुरवठा केले जाते. म्हणून जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रदीप जवळ यांनी केले. बोदवड तालुक्यात २२ १९ मध्ये २२ हजार पशुधन होते. त्यात शेळी-मेंढी ७ हजार ८५०, दुधाळ गट ९ हजार ३०० व इतर पशुधन १४ हजार ५०० असे प्रमाण होते.

Share

-