उधारी फेडण्यासाठी माहेरहून दीड लाख आण, सासरच्या मंडळींनी विवाहितेसोबत केलं भयंकर कृत्य

परभणी: उधारी फेडण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये, असा जाच करुन तसेच विवाहित महिलेस मारहाण करुन मानसिक त्रास देत उपाशी ठेवल्याप्रकरणी विवाहिता काजल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सासरच्या नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, काजल हिचा विवाह अरविंद व्यंकटराव गायकवाड यांच्या सोबत झाला होता. काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या व्यक्तींनी काजलला उधारी फेडण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये, असं सांगत तिला मारहाण करुन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यासोबत तिला उपाशी पोटी ठेवून तिचा जाच करायला सुरुवात केली. यानंतर मात्र विवाहितेने पोलीस स्टेशन गाठलं.

या प्रकरणी विवाहित काजल अरविंद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अरविंद व्यंकटराव गायकवाड, सासु कलुबाई व्यंकट गायकवाड, धुराबाई, दीर बाबू गायकवाड, धनराज गायकवाड, जाऊ गंगासागर गायकवाड, भाचा अक्षय कांबळे, निखिल कांबळे, मायावती कांबळे रा. उमरी ता. इंद्रावेली जि. अदिलाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसापासून परभणीमध्ये विवाहितांच्या छळाच्या घटना वाढल्या आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published.