बालपणीचे फोटो शेअर करत भावुक झाली कंगना:म्हणाली- लहानपणी पैसे वाचवून कॅमेरा घेतला, जिथे जायचे तिथे पोज द्यायचे आणि फोटो घ्यायचे
‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या कंगना रणौतने नुकतेच तिचे बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पोज देताना दिसत आहे. तिच्या बालपणाची खास झलक दाखवत कंगनाने सांगितले की, तिने लहानपणी थोडे पैसे वाचवून कॅमेरा विकत घेतला होता आणि संधी मिळताच ती तिचे फोटो क्लिक करत असे. कंगनाने तिच्या एका फोटोसोबत लिहिले आहे, ‘मी जेव्हाही जुने फोटो पाहते तेव्हा मला...