मल्याळम अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या बळी:माजी न्यायाधीश हेमा यांच्या रिपोर्टमध्ये दावा- हीरो करतात मनमानी, निर्माते भूमिकांच्या बदल्यात फेव्हर मागतात
देशाला मोहनलाल, मामूट्टी, फहाद फाजिल यांसारखे अनेक प्रतिभावान आणि प्रसिद्ध अभिनेते देणारा मल्याळम चित्रपट उद्योग सध्या वादात सापडला आहे. कारण सोमवारी जारी करण्यात आलेला 295 पानी न्या. हेमा आयोगाचा अहवाल. केरळ सरकारने जारी केलेल्या या अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगात कास्टिंग काउच आणि लैंगिक छळ यासारख्या गंभीर समस्यांचा उल्लेख आहे. या अहवालाची प्रतही माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. महिलांना...