हमासने 3 इस्रायली ओलीस सोडले:रेडक्रॉसच्या मदतीने इस्रायल गाठले; 183 पॅलेस्टिनी कैद्यांची लवकरच सुटका
हमासने शनिवारी यार्डन बिबास (35), ऑफर कॅल्डेरॉन (54) आणि कीथ सिगेल (65) या इस्रायली ओलीसांची युद्धविराम करारानुसार सुटका केली. रेडक्रॉसच्या मदतीने हे इस्रायली लष्कराकडे सुपूर्द करण्यात आले. कीथ सिगल वगळता इतर दोन ओलीस इस्रायलला पोहोचले आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, याच्या बदल्यात इस्रायल लवकरच 183 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. गेल्या आठवड्यात हा करार लागू झाल्यापासून एकूण 10 इस्रायली आणि 5 थाई...