शतकातील सर्वात धोकादायक वादळ मिल्टन अमेरिकेला धडकले:तीन महिन्यांचा पाऊस 24 तासांत पडला; 20 लाख लोकांना पुराचा फटका
मिल्टन चक्रीवादळ गुरुवारी सकाळी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ‘सिएस्टा की’ शहराच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे फ्लोरिडा येथील सेंट पीटर्सबर्ग येथे 24 तासांत 16 इंच पाऊस पडला आहे. गेल्या एक हजार वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे. अवघ्या 3 तासांत परिसरात 3 महिन्यांचा पाऊस पडला. फ्लोरिडाला धडकणारे मिल्टन हे वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. सिएस्टा कीच्या किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी मिल्टन हे श्रेणी 5 मधील चक्रीवादळ होते....