इम्रान खान यांना 14 वर्षे तुरुंगवास:माजी पंतप्रधानांच्या पत्नीलाही 7 वर्षांची शिक्षा; खान आधीपासूनच तुरुंगात
पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा जाहीर केली. इम्रान यांना 14 वर्षांची तर बुशरांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. इम्रान खानला 9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर...