इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम:पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका; उर्वरित 15 दिवसांनी सोडले जातील
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीबाबतचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मदतीने कतारची राजधानी दोहा येथे चर्चा सुरू आहे. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, कराराच्या पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका केली जाईल. हमासकडे 94 इस्रायली ओलीस आहेत, त्यापैकी सुमारे 34 मरण पावले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने 251 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. उर्वरित ओलीसांची...