श्रीलंकेने 8 भारतीय मच्छिमारांना अटक केली:2 बोटीही जप्त; सीमा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप
श्रीलंकेच्या नौदलाने रविवारी 8 भारतीय मच्छिमारांना अटक केली आणि दोन बोटी जप्त केल्या. या लोकांवर श्रीलंकेच्या पाण्यात अवैध मासेमारी केल्याचा आरोप आहे. श्रीलंका सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नौदलाने मनरारच्या उत्तरेला विशेष ऑपरेशन राबवून या लोकांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले की, 11 जानेवारीच्या रात्री भारतीय मच्छिमारांचा एक गट श्रीलंकेच्या पाण्यात बेकायदेशीरपणे मासेमारी करताना दिसला. यानंतर नौदलाने...