नाटो प्रमुख म्हणाले- आम्ही युक्रेन युद्ध थांबवू शकलो असतो:आधी शस्त्रे दिली असती तर हल्ला झाला नसता, रशिया चिडण्याची अमेरिकेला भीती होती
जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉलटेनबर्ग यांनी म्हटले आहे की, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याविषयी माहिती नाटोला आधीच होती. नाटो प्रमुख म्हणाले की, “आमच्याकडे रशियाच्या योजनेची गुप्तचर माहिती होती, परंतु तरीही हा हल्ला धक्कादायक होता.” स्टोल्टनबर्ग म्हणाले की, युक्रेनवर रशियाचा हल्ला रोखण्यासाठी नाटो आणखी काही करू शकला असता. नॉर्वेचे माजी पंतप्रधान स्टॉलटेनबर्ग म्हणाले, “जर नाटोने युक्रेनला शस्त्रे देण्यास सुरुवातीपासूनच...