Category: मराठी न्यूज

Marathi News

नागपूरमधील घटनेला काँग्रेसच जबाबदार:हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला, रावसाहेब दानवे यांचा दावा

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब...

मी माझ्या वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नाही:हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर दिले स्पष्टीकरण

औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत, अशी विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. आपल्या या विधानावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. आमची टीका ही राजकीय टीका आहे. मी फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केलेली नाही तर राज्य कारभारावर केलेली आहे, असे स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ...

नागपूर हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी संतापले:म्हणाले – सरकारच चिथावणी देत आहे, मुख्यमंत्री-मंत्री आहोत याचेही भान त्यांना नाही

नागपूर हिंसाचाराला सरकार जबाबदार असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले. सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून भडकाऊ विधाने केली जात असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचेही त्यांना भान नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली. मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची विधाने बघा. सरकारचे चिथावणी देत आहे, अशा शब्दांत ओवेसी यांनी नागपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला. ते दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरमधील...

औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर फेकली पाहिजे:उदयनराजे भोसलेंची मागणी, नागपूर हिंसाचारावरून काँग्रेसवर केले गंभीर आरोप

दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. औरंगजेब...

विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे:6 पैकी 5 जणांचे अर्ज वैध, अपक्ष उमेदवाराचा अर्ज झाला बाद; 27 मार्चला मतदान

विधान परिषदेसाठी रिक्त पाच जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. निवडणुकीसाठी 6 जणांचे अर्ज आले होते. मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर...

प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका:कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; आता पोलिसांना शरण येण्याशिवाय दुसरा मार्ग नाही

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे कोरटकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. आता त्यांच्यापुढे पोलिसांपुढे शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत कोरटकर यांच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याचा आरोप आहे. स्वतः सावंत यांनी एका पोस्टद्वारे...

औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय:त्यात दंगल करायचे कारण काय, केंद्राकडे ते थडगे काढण्याची मागणी करा – उद्धव ठाकरे

नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. थडगे काढण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन औरंगजेबाचे थडगे काढण्याची मागणी करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण देतेय, तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला....

माणिकराव कोकाटेंना तूर्तास दिलासा:सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. नाशिक कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शिवाय सर्व प्रतिवादींना नोटीसही जारी केली आहे. त्यामुळे कोकाटेंना हा तूर्त दिलासा मिळाला असला, तरी सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार राहणार असल्याचे म्हटले जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...

भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय:BJP ला सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवल्या जातात, आदित्य ठाकरे यांचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपची महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे. त्यांना ज्या ठिकाणी सत्ता राबवता येत नाही, त्या ठिकाणी ते दंगली घडवतात, असे ते म्हणालेत. खुलताबाद स्थित औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून सोमवारी रात्री नागपूर येथे हिंसाचार झाला. त्यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. या प्रकरणाचे विधिमंडळातही...

पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई होणार:​​​​​​​नीतेश राणे यांचे नागपूर दंगलीवर भाष्य; फडणवीसांनी शांत बसण्याची तंबी दिल्याचीही चर्चा

नागपूर दगंलीतील आरोपींवर पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता. समाजकंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यामु्ळे सरकार शांत कसे राहील? या प्रकरणी आरोपींना त्यांच्या पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल अशी कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. नीतेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी...

-