Category: मराठी न्यूज

Marathi News

कटकारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी:मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे, धनंजय देशमुख भूमिकेवर ठाम

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे. या कटकारस्थानात जी माणसे आहेत त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी मांडली आहे. धनंजय देशमुख म्हणाले, आमची शेवटपर्यंत एक मागणी आहे. आमच्या मागणीत कधीही बदल होणार नाहीत. या कट कारस्थानात जे...

सर्व दोषी पकडले गेले पाहिजेत:संतोष देशमुखांवर झालेल्या टॉर्चरप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, खासदार सोनवणे यांची मागणी

सर्व दोषी पकडले गेले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेच आहेत की आम्ही कोणालाही सोडणार नाही. तसेच आदेश तपास यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस यातील सर्वच आरोपींचे कॉल डीटेल काढून कारवाई करतील, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. त्यात आता वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांनी तसेच समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे. कराडच्या आईने देखील यात सहभाग घेतला आहे. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी...

ऐतिहासिक हनुमान यात्रा:बारा गाड्या ओढण्याची आडगावात अनोखी परंपरा, पौष महिन्यातील पौर्णिमेला भरतो यात्रोत्सव

पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आडगाव बुद्रुक गावात ऐतिहासिक हनुमान यात्रा ​​​भरते. अनेक वर्षांपासून चालू असलेली बारा गाड्या ओढण्याची परंपरा या गावात आजही कायम आहे. शहरातील झाल्टा फाटा जवळच आडगाव बु. गाव आहे. येथे बारागाड्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. यंदा 13 जानेवारी रोजी साधारण एक किलोमीटर अंतरावरून ते हनुमान मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढल्या गेल्या. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम...

कायद्याच्या कचाट्यात जे काही सापडतील त्यांना सोडले जाणार:वाल्मीक कराड समर्थक आक्रमक झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. तसेच राज्य सरकारने जुनी एसआयटी रद्द करत नवीन एसआयटी स्थापन केली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला असून परळी येथे कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या समर्थकांनी आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे यांच्या फोटोला चपलीने मारत तीव्र निषेध व्यक्त केला आहे....

येवल्याच्या पतंगोत्सवात समीर भुजबळांचा सहभाग:सहकाऱ्यांसोबत पतंग उडवण्याचा घेतला आनंद, विरोधकांना दिला सूचक इशारा

मकरसंक्रातीनिमित्त येवल्याच्या पतंग उत्सवाला साडेतीनशे वर्षाच्या परंपरेचा साज असल्याचे म्हटले जाते. हा उत्सव आजही संपूर्ण येवलेकर मोठ्या उत्साहात साजरा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते समीर भुजबळ यांनीही आज येवल्यात पतंगउत्सवात सहभाग घेत पंतग उडविण्याचा आनंद घेतला. आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांच्या पतंग कापणार, सूचक इशारा समीर भुजबळ यांनी यावेळी दिला. मकरसंक्रांतीनिमित्त येवला शहर तीन दिवस पतंगनगरी झालेले असते. कर, मकरसंक्रांत आणि भोगी...

CM देवेंद्र फडणवीसांकडून पानिपत शौर्य भूमीवर अभिवादन:म्हणाले – पानिपतच्या लढाईनंतर परकीय आक्रमणाची हिंमत झाली नाही

पानिपतचे तिसरे युद्ध इतिहासातील सर्वांत मोठी घटना आहे मराठ्यांची वीरता आणि शौर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला छत्रपतींच्याच आशीवार्दाने संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचे काम मराठ्यांनी केले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा तांत्रिकदृष्ट्या पराजय झाला, तरी मराठे कधीच हारले नाहीत. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांनी आपले शौर्य इतके वाढवले की, या भारतावर आक्रमणे करण्याची हिंमत कुणाची झाली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पानिपतच्या...

शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका:शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचा कुंभमेळ्यात मृत्यू, सोलापूरवर शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. ते प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. कुंभमेळ्यात शाही स्थान केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. शरद पवार यांचे निकटवर्तिय म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. कुंभमेळ्याच्या पर्वावर निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या निधनानंतर सोलापूर शहरावर शोककळा पसरली आहे. आमदार देवेंद्र कोठे हे...

वाल्मीक कराडच्या आईचे परळीत ठिय्या आंदोलन:म्हणाल्या – माझा लेक देवमाणूस, त्याला न्याय मिळेपर्यंत येथून हलणार नाही

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भावाला न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. माझ्या मुलाने काही केले नाही. त्याला सोडावे, अशी पारुबाई कराड यांची मागणी आहे. वाल्मीक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेली...

महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नाही:कटुता सत्ताधारी महायुतीत, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांचा दावा

महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नाही. कटुता ही सत्ताधारी पक्षात आहे. शरद पवार आणि मी भेटलो, यात नवीन काय आहे? महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिले पाहिजे, असे विधान संजय राऊत यांनी केले. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यावर लक्ष ठेवा, असेही राऊत म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महानगरपालिका...

रत्नागिरीत विद्यार्थिनीची छेड; शिक्षकास बदडले:प्रकरण तापल्यानंतर कंत्राटी शिक्षकाचे केले निलंबन

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने पालकांनी शिक्षकाला चांगलेच बदडल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी शिक्षकास ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. मुलीने तिच्या पालकांना शिक्षकाच्या या अश्लील कृत्याची माहिती दिल्यानंतर पालकांनी थेट शाळा गाठली आणि शिक्षकाला चोपले. या वेळी त्या शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे...

-