Category: मराठी न्यूज

Marathi News

आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केली आहे. मोठ्या पक्षांना आमच्यासारख्या छोट्या पक्षांची गरज नसते. आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची ते माझ्या बुद्धीला पटते म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बुथप्रमुखापासून वॉर्ड प्रमुखापर्यंत तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष, राज्य आणि केंद्रीय पातळीवर आम्ही टार्गेट ठेवले आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. महादेव जानकर...

मी यापुढे निवडणूक लढणार नाही:लोकांना विकास नकोय, जातीपातीचे राजकारण सुरू आहे; अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथील अंभई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी आमदार-मंत्री असताना 18-18 तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला,...

मंत्रालयात महागडी लम्बोर्गिनी कार कोणाची?:व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एक काळ्या रंगाची लम्बोर्गिनी कार आली होती. या महागड्या कारमधून एक व्यक्ती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आली असल्याची माहिती नंतर समोर आली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हंटले, व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे...

संतोष देशमुख प्रकरणी नवीन एसआयटी:वाल्मीक कराडच्या संपर्कातले अधिकारी वगळण्यात येणार, आमदार सुरेश धसांनी दिली माहिती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेली एसआयटी आता बदलण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. जुन्या एसआयटीमध्ये वाल्मीक कराडच्या ओळखीचे अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे नवीन एसआय टी स्थापन करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 साली...

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन:बेळगावात झाले अंत्यसंस्कार; ‘राष्ट्रवीर’कार पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सिमालढ्यातील प्रमुख सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय 97 वर्षे होते. सिमालढ्याच्या चालता बोलता इतिहास व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा कामगार नेता अशी त्यांची ओळख होती. अप्पा म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात प्रा. आनंद मेणसे, ॲड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, नीता पाटील...

शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत बोलताना शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संविधानाच्या अमृत महोत्सवी...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार:डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सह्याद्री अतिथीगृहात मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील...

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे:आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण...

ऑनर किलिंग रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल:प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार ‘सुरक्षागृह’, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे निर्देश

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर...

भाजपमध्ये सगळे दगाबाजी करून मंत्री झाले:अमित शहांनी जरा रिसर्च करावा, संजय राऊत यांचा पलटवार

शिर्डी येथे भाजपचे अधिवेशन पार पडले, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले. भाषणातून अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांनी दगाबाजीचे राजकारण केले असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. अमित शहा यांनी जरा रिसर्च करणे गरजेचे असल्याची टीका संजय राऊत यांनी...

-