Category: मराठी न्यूज

Marathi News

मुख्यमंत्री कोण?:निर्णय लांबल्याने देवेंद्र यांच्या नावाबाबत शंका, तावडे, मोहोळ यांचीही चर्चा

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चेनंतरही भाजप शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू शकला नाही. त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी भाजप हायकमांडच्या मनात वेगळे काही आहे का? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. प्रदेश भाजपच्या एकाही नेत्याला याबाबत मागमूस लागत नाहीय. पुन्हा संधी मिळण्यासाठी फडणवीस यांच्या जमेच्या व कमकुवत बाजूंचा आढावा… भाजपची बैठक रद्द, नाराज एकनाथ शिंदेही...

भांडूपच्या शाळेत लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून 3 चिमुकलींची छेडछाड:शाळा प्रशासनाकडून पोलिसात न जाण्यासाठी दबाव पालकांचा आरोप

भांडुपमध्ये लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. शाळेत योगासन शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थीनीनी याबद्दल माहिती दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या तळघरात दोन अल्पवयीन विद्यार्थीनी योगा करत होत्या. यावेळी शाळेतील साफ-सफाई अन् लिफ्टचे...

पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या, गंगाखेडमधील घटना:कारण अस्पष्ट, तिघेही झोपले रेल्वे रुळावर

गंगाखेड येथील शिक्षकाने पत्नी व मुलीसह, रेल्वे रुळांवर झोपून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या सामूहिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मसनाजी सुभाष तुडमे (४५), त्यांच्या पत्नी रंजना तुडमे (४०) व मुलगी अंजली तुडमे (२१, सर्व रा. किनी कहु. ता.अहमदपूर, ह.मु. बळीराजा कॉलनी, गंगाखेड) अशी मृतांची नावे आहेत. गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक कन्या विद्यालयातील शिक्षकाने...

मुख्यमंत्रिपदासाठी 178 आमदारांची देवेंद्रांना पसंती:एकनाथ शिंदेंची समजूत काढून अमित शहा घेणार अंतिम निर्णय

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सोमवारी रात्री दिल्लीत एका खासगी कार्यक्रमानिमित्त गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी मात्र अशी कोणतीही पूर्वनियोजित बैठक नव्हती, असे सांगून जास्त बोलणे टाळले. भाजपचे सर्वाधिक १३२ आमदार आहेत. त्यांचा स्ट्राइक रेटही सर्वाधिक...

कालिदास कोळंबकर यांचा वडाळा मतदारसंघातून विजय:यापूर्वी 8 वेळा झाले आमदार, आदिती तटकरेंही झाल्या विजयी

वडाळा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे 9 व्यादा विजयी झाले आहे. जवळपास 22 हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे. कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नारायण राणेंनी जेव्हा जेव्हा पक्ष बदलला, तेव्हा तेव्हा कोळंबकरांनीही त्यांच्याबरोबर पक्ष बदलला आहे. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि...

धनगरांची लोकसंख्या एक काेटीवर, तरी केवळ 1 आमदार:72 ते 75 मतदारसंघांमध्ये विखुरला आहे समाज, यंदा फक्त9 जण निवडणूक रिंगणात

मराठा समाजानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची तब्बल १.०५ कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे. राज्याच्या लोकसंख्येचा ८-९% हिस्सा असणारा हा समाज प्रामुख्याने १७ ते १८ जिल्ह्यांतील ७२ ते ७५ मतदारसंघात विखुरलेला आहे. २०१४ च्या विधानसभेत धनगर समाजाचे ५, तर २०१९ मध्ये केवळ १ आमदार राहिला. यंदा निवडणुकीच्या तोंडावर धनगरांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. मात्र, महायुती किंवा मविआने त्याची फारशी दखल न घेता धनगर...

हवा कुणाची, उत्तर महाराष्ट्र, ग्राउंड रिपोर्ट:आयारामांना मानाचे पान, घराण्यांना बंडखोरांचे आव्हान

उत्तर महाराष्ट्र, ग्राउंड रिपोर्ट जरांगेंच्या जाहीर आव्हानामुळे मंत्री महाजन, भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आघाडीसमोरही बंडखोरीचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे बंडोबांच्या खेळावर इथली हवेची दिशा ठरणार आहे. ‘सगळे पक्ष सारखेच आहेत. सर्वांना फक्त जास्त आमदार आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता हवी आहे. मग आम्ही स्वत:चा विचार करून मतदान केले तर आमची काय चूक?’ हा प्रश्न होता धुळ्यातील एका मध्यमवयीन मतदाराचा. संदर्भ...

सारवासारव:‘देशद्रोहा’चा आरोप, मलिकांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार, आधी केला उमेदवारीला विरोध

भाजपच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात माजी मंत्री नवाब मलिक यांना शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिला. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. मविआ सरकार असताना याच मलिक यांना देशद्रोही म्हणून भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. आता महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचेे अबू आझमी हे मविआचे उमेदवार आहेत....

नवा डाव:शरद पवार गटाची पहिली यादी; 45 पैकी 10 उमेदवार आयात, अहेरीत होईल बाप-लेक लढत

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभेसाठी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १० उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले आहेत. यात प्रामुख्याने हर्षवर्धन पाटील – इंदापूर, सुधाकर भालेराव – उदगीर, संदीप नाईक – नवी मुंबई, डाॅ. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा, भाग्यश्री अत्राम – अहेरी, समरजितसिंह घाटगे – कागल, प्रताप ढाकणे – शेवगाव, चरण वाघमारे – तुमसर, बापूसाहेब पठारे – वडगाव...

महाविकास आघाडीत 200 जागांवर मतैक्य:शरद पवार यांची माहिती, म्हणाले – मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर चर्चा करून ठरवू

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. मविआची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहेच. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जागांबाबतचा निर्णय जयंत पाटील घेणार आहेत. दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास...

-