विधान परिषदेतील चर्चेत महायुती सरकारला घोषणांवरून घेरले:90 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला दिले फक्त 61 कोटी- दानवे
मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणारा मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प ३० हजार कोटींवरून ९० हजार कोटींवर गेला आहे. मात्र, त्यासाठी काही महिन्यांपूर्वी फक्त ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. महायुती सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे, असा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.मंगळवारी २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी शेतकरी...