Category: मराठी न्यूज

Marathi News

मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून पाठवा:सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी

मराठवाड्यामध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून शासनाने पाठवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांच्यासारख्या स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राला गरज असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते? या बाबत आता चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख...

सत्ताधाऱ्यांचा मराठवाड्यावर अन्याय:वॉटरग्रीड योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

राज्याच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या 260 अन्वये प्रस्तावावर ते आपली भूमिका मांडत होते. सत्ताधारी पक्षाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा फक्त कागदावरच ठेवली असून तिच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्षात यासाठी काहीच निधी देण्यात आला नाही....

महाविकास आघाडीचा नेता अखेर ठरला:भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष नेता मिळेल, एवढे देखील सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी मिळून आता विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप या पदावर कोणाची वर्णी लागेल? याचा निर्णय झालेला नव्हता. अखेर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात...

पोलिसांसाठी फरार सतीश भोसलेची वृत्तवाहिनीला मुलाखत:सर्व आरोप फेटाळले; अटकपूर्व जामिनासाठी बीड न्यायालयात अर्ज

भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप होत आहेत. मात्र, तो पोलिसांना सापडलेला नसतानाच एका वृत्तवाहिनीवर त्याने मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्याने त्याच्यावर होणारे सर्व आरोपी फेटाळले आहे. सर्व प्रकरणातील सत्याचा तपास करा, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नाही तर स्वतःहून पोलिसांना शरण जाईल, असेही त्याने वृत्त वाहिनीशी...

बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची मागणी; छेड काढणाऱ्यांना चोप देण्याचाही सल्ला

महिलांच्याबाबतीत घडणाऱ्या अशा घटना कमी करायच्या असतील तर मनातच भीती निर्माण करायला हवी. यासाठी महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केलं पाहिजे, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत, याप्रकरणी राज्यपाल बागडे यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य...

रवींद्र धंगेकर यांच्यावर टांगती तलवार तयार करण्यात आली:पत्नीला अटक होण्याची भीती वाटल्याने त्यांचे पक्षांतर; संजय राऊतांचा आरोप

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली होती. त्यांच्या पत्नीला अटक होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता...

अर्थसंकल्पात ना आश्वासनांचे भान, ना वचनांची जाण:फक्त बडबडे आणि त्यांनी सोडलेले पोकळ संकल्पांचे बुडबुडे! उद्धव ठाकरे गटाची टीका

विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने आधी दिलेली आश्वासने आणि पाच वर्षांत करायची नवी कामे याची नोंद त्यात दिसेल, अशी जनतेची भाबडी अपेक्षा होती. मात्र राज्यकर्त्यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांच्या ‘गरज सरो वैद्य मरो’ या मानसिकतेचे दर्शन घडविले. राज्यातील जनतेच्या पदरात तर काही टाकले नाहीच, परंतु शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पाने पुसण्याचा कृतघ्नपणा केला. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात ‘‘का आम्हाला सत्ता मिळाली...

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला फडणवीसांचा पाठिंबा:म्हणाले- ‘हे कायद्याच्या कक्षेत राहून करावे लागेल, काँग्रेसच्या काळात ASI संरक्षण दिले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांना हे हवे आहे, पण तुम्हाला ते कायद्याच्या कक्षेत करावे लागेल, कारण हे एक संरक्षित ठिकाण आहे. काही वर्षांपूर्वी, काँग्रेसच्या काळात, हे ठिकाण एएसआयच्या संरक्षणाखाली ठेवण्यात आले होते. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले भाजपचे साताऱ्याचे...

आव्हाडांकडून बगला घासत राज ठाकरेंची नक्कल:महाकुंभातील स्नानाच्या विधानावरून मनसे प्रमुखांचे कौतुक करत ठोकला सलाम

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महाकुंभातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती. अरे हाड, कोण पिणार ते गंगेचे पाणी, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बगला घासत राज ठाकरे यांची नक्कल केली. तसेच त्यांच्या त्या विधानाचे कौतूक करत त्यांच्या डेअरींगला सलामही ठोकला. राज ठाकरे...

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?:CM फडणवीस म्हणाले – जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून मिळतील

यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. पण निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. लाडकी बहीण...

-