Category: मराठी न्यूज

Marathi News

बीड जिल्हा केंद्रशासित करा, तिथे हैवानांचा हैदोस:माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी, अनेक बळी जाण्याची व्यक्त केली भीती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडमधील गुन्हेगारी, दहशत तसेच कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची धक्कादायक मागणी केली. तसेच तिथे हैवानांचा हैदोस सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे...

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिसांची बैठक:खासदार बजरंग सोनवणे यांचा गंभीर आरोप, आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची केली मागणी

मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याची बैठक झाली असल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या पूर्वी आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता. खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाली असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मस्साजोग...

बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये:कोणावरही दयामाया दाखवू नका; मुख्यमंत्र्यांचा SP-CID अधिकाऱ्यांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. धनंजय देशमुख यांच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपींशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. संतोष...

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी:कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गालगत ऍग्रो हब उभारण्यात यावेत असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गगा लगत उभारण्यात येणार...

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचे दुर्लक्ष?:मंत्रालयातून शिंदे समितीचे कार्यालयच गायब, मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना दिले दालन

मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंद समितीचे कार्यालयच मंत्रालयातून गायब झाले असल्याचे समोर आले आहे. शिंदे समतीचे कार्यालय हे मंत्रालयातील सातव्या मजल्यावर होते. मात्र, आता तिथून हे कार्यालय गायब झाले असून यामुळे आता कार्यालयाशिवाय शिंदे समितीचे कामकाज कसे चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाने संपूर्ण सरकारला...

बीड हत्याकांड व खंडणी प्रकरण:आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज न्यायालयाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती. त्याची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...

मित्राने हात दाखवला म्हणून टेम्पोतून खाली उतरला:अवघ्या 10 मिनिटांनीच झाला भीषण अपघात, नाशिक अपघातात तरुण थोडक्यात बचावला

नाशिक येथील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. गजाने भरलेल्या ट्रकवर एक टेम्पो जाऊन धडकली तेव्हाच मागून येणारे वाहन हे त्या टेम्पोला जाऊन धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की ट्रकमधील लोखंडी गजा (सळ्या) टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि टेम्पोच्या मागे बसलेल्या तरुण मुलांच्या शरीरात...

नेत्यांमधील मतभेद विचाराधारांबाबत, वैयक्तिक नाही:राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र होतो, अमृता फडणवीसांचे सूचक विधान

अलिकडच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. यावरून मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. नेत्यांमध्ये विचाराधारांबाबत मतभेद आहेत. त्यामुळे एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होते, अशी कितीतरी उदाहरणे असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांनी संघाच्या कामाबद्दल केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक...

आंदोलनानंतर धनंजय देशमुखांना अश्रू अनावर:टाकीवरून खाली उतरताच मनोज जरांगेंना मारली मिठी, जोरजोरात फोडला हंबरडा

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेला, मात्र, अद्यापही एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास 2 ते 3 तास हे आंदोलन चालले. पोलिसांचे आश्वासन आणि मनोज जरांगेंच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. टाकीवरून खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंच्या गळ्यात पडून...

भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुक

अवैध वाळू उपसा व वाहतुुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या...

-