नागपूर विमानतळावर राडा:ठाकरे गटाच्या आक्रमक शिवसैनिकांमुळे पोलिसांनी नीतेश राणेंना मागच्या दाराने बाहेर नेले
नागपूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली. दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी...