Category: मराठी न्यूज

Marathi News

रोहित पवारांच्या डोक्यात 50 टक्के शेण भरलेले:त्यामुळेच ते बालिश वक्तव्य करतात, अमोल मिटकरी यांची जहरी टीका

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे 10 ते 12 आमदार निवडून येणार नाहीत, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. या वक्तव्यावरून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांचा समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांच्या डोक्यात 50 टक्के शेण भरले असल्यामुळे ते बालिशपणाने बोलतात, अशी जहरी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी...

मोदींच्या हस्ते पुण्यात विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन:लाडक्या बहिणी अन् भावांना माझा नमस्कार, पंतप्रधानांची मराठीतून भाषणाला सुरुवात

पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रो कॉरिडोरचे उद्घाटन तसेच स्वारगेट ते कात्रज पर्यंतच्या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन आणि सोलापूर येथील विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाई करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांना माझा नमस्कार, असे मराठी भाषेत भाषणाला सुरुवात केली. मोदी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मला अनेक कार्यक्रमांच्या उद्घाटन आणि लोकापर्णासाठी...

आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का?:एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला

विरोधकांना दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे. बदलापूर प्रकरणात आधी म्हणत होते. आरोपीला भरचौकात फाशी द्या. आता आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलिसांनी बंदूकी शोकेसमध्ये ठेवायच्या का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटन प्रसंगी मविआला लगावला आहे. सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे मेट्रोचा कार्यक्रम खरेतर गुरुवारी होणार होता. परंतू पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सर्वकाही तयारी होती....

भास्कर जाधवांच्या विधानाने चर्चांना उधाण:मविआत काँग्रेसच्या जास्त जागा अन् राष्ट्रवादीच्या स्ट्राइक रेटने उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली

लोकसभा निवडणुकीत मविआत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्याने आणि शरद पवारांचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडेसे प्रेशर खाली आले आहेत असे दिसत आहे, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान भास्कर जाधव म्हणाले की, मी हे विधान जबाबदारीने केले आहे. माझ्यासाठी राजकीय दृष्ट्या हे अडचणीचे आहे. पण उद्धव ठाकरे यांनी प्रेशर खाली येण्याची...

मराठ्यांना बाजुला ठेवणे तुमची घोडचूक असेल:सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, मनोज जरांगेंचा अमित शहांवर निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आम्ही अनेक आंदोलने हाताळली आहेत. त्याप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू, असे म्हटले होते. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले, तर तुम्हाला सत्ता मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पण मराठ्यांना बाजुला ठेवले तर तर ती...

पुणे मेट्रोचे उद्धाटन लांबले म्हणून काहींनी छात्या बडवल्या:त्यांनी आजपर्यंत एक पिलर उभारला नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

ज्या लोकांनी आपल्या जीवनभरात एकही विकास काम केले नाही, ते लोकं पुणे मेट्रोच्या लोकार्पण सोहळा पुढे ढकलला गेला आणि लोकं अशा छात्या बडवत होते, असा हल्लाबोल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही काही तरी करुण दाखवा आणि मग छात्या बडवा असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावाला आहे. पुणे मेट्रोचे काम...

मोदी सरकार काही दिवसांचे सोबती:पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार अन् चंद्राबाबू साथ सोडतील, जयंत पाटील यांचा विश्वास

केंद्रातील मोदी सरकार काही दिवसांचे सोबती आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांची साथ सोडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेला सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीतही आमची सत्ता येणार असल्यामुळे महायुती सरकार कोणत्याही योजना राबवून तिजोरी रिकामी करत आहे, असा आरोप पाटील यांनी...

शासनाकडून विमा कंपनीला 158 कोटींचा निधी मिळण्याची प्रतिक्षा:3.07 लाख शेतकऱ्यांचे डोळे शासनाकडे

हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आदेश दिले आहेत. मात्र अद्याप शासनाकडून 158 कोटींचा निधी विमा कंपनीकडे वर्ग झाला नसल्याने 3.07 लाख शेतकऱ्यांनी अग्रीमसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. आता शासनाकडून निधी कधी वर्ग केला जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी ता. 1 व ता. 2 सप्टे्ंबर रोजी...

महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा शिंदे सरकारचा डाव:लाडकी बहिण योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाही- संजय राऊत

राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाही, भविष्यात पोलिस दलातील लोकांना लाडक्या बहिण योजनेमुळे पगार मिळतील का नाही ही भीती आता व्यक्त होत आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते मिळावी यासाठी सर्व निधी त्या योजनेकडे वळवला आहे. त्या योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान...

रोहित पवार मुख्यमंत्री होणार?:रोहित पुढची 5 वर्षे  महाराष्ट्राची सेवा करेल, शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार म्हणाले की, रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे....

-