अखेर गणेश मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी:आवश्यक तिथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण, मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन
माघी गणेशोत्सव 2025 अंतर्गत श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी नाकारली होती. मात्र, आता श्रीगणेश मूर्तींचे योग्यरित्या विसर्जन व्हावे, यासाठी आवश्यक तिथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. तसेच पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी महानगरपालिकेने गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे...