Category: मराठी न्यूज

Marathi News

महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीवरुन सुप्रिया सुळेंचे दिल्लीत आंदोलन:संसदेतही मांडला मुद्दा; न्याय मिळेपर्यंत आवाज बुलंद करणार

जनहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या तासात आज लोकसभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांचा मुद्दा उपस्थित केला. गेली काही महिन्यांपासून ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. पण 4 फेब्रुवारी पासून खरेदी बंद झाली आहे. एकट्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात सुमारे 40 हजार शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन नोंदणी केली. परंतु केवळ 20 हजार शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली...

बीड जिल्ह्यात पुन्हा गुंडांचा हल्ला:माजलगावातील स्मशानभूमी देखील सुरक्षित नाही? मोटारसायकल जाळली, स्वर्ग रथही फोडला

माजलगाव शहरातील पावर हाऊस रोडवर सिंदफना काठावर राजस्थानी समाजाची स्मशानभूमी असून रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ५ ते ७ गुंडानी याठिकाणी घुसून उभा असलेला स्वर्ग रथ फोडून टाकला. स्वर्ग रथाचे चालक सय्यद बाबु सय्यद उस्मान यांना मारहाण केली. शिवाय या ठिकाणी राहण्यास असलेले गंगाधर गायकवाड यांची मोटर सायकल पेटवून दिली. माजलगाव मध्ये पोलिस प्रशासन आहे की नाही? अशी परिस्थिती असून...

आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंचा होणार समावेश:आधी डावलल्यानंतर आता वाईल्ड कार्ड एन्ट्री, मंत्रिमंडळ बैठकीत नियमात करणार बदल

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. परंतु सरकारकडून हा निर्णय आता फिरवण्यात येणार आहे. राज्य सरकारने या निर्णयात बदल केला असून एकनाथ शिंदेंचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये 2005...

सर्वांनाच मुले असतील, त्यामुळे यात राजकारण नको:ऋषीराज सावंत अपहरण नाट्यावरुन मोठ्या भावाचे आवाहन; स्पष्टच सांगितले कारण

वडिलांच्या भीतीपोटी ऋषीराज सावंत याने बँकॉकच्या दौऱ्याविषयी सांगितले नाही, अशा शब्दात शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी अपहरण नाट्यासंदर्भातील सर्व हकिगत सांगितली. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे आता या प्रकरणावर...

अजितदादांना जवळ करत शिदेंना दूर लोटणार:देवेंद्र फडणवीसांची अशी रणनिती, अंजली दमानियांचे राजकीय विश्लेषण; चर्चांना उधाण

अजित पवार यांना जवळ करत एकनाथ शिंदे यांना दूर लोटण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. दमानियांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ते नाराज दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा...

ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करणारा तारा निखळला:रा. रं. बोराडेंच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने दर्जेदार साहित्यिक गमावला

मराठी ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यात आपले महत्वाचे योगदान देणारे कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मान्यवरांनी म्हटले आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा...

जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का?:आमदार सुरेश धस यांचा संताप; म्हणाले – ‘त्यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको’

परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील...

आजपासून 12 वीची परीक्षा:संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीचा देखील पहिलाच पेपर; म्हणाली – ‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार’

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुलींचा समावेश आहे. 37 तृतीयपंथी विद्यार्थीही यंदा परीक्षा देतील. राज्यातील 3 हजार 373 केंद्रांची सोय त्यासाठी केली आहे....

मराठी कथाकार, कादंबरीकार, ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांचे निधन:वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘पाचोळा’कार बोराडे म्हणूनही मिळाली ओळख

मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक म्हणून ओळख असणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले. 84 वर्षांचे होते. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जात. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ‘पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना...

तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला, सुषमा अंधारेंचा निशाणा:तर नागपूरच्या अधिवेशनातून ते असेच गेले, म्हणत आव्हाडांचीही टीका

तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. मुलगा घरातून भांडण करून निघून गेला अशा वेळी केवळ त्या मुलाला अडवायचे असल्याने सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणे गरजेचे होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, पैसा असल्याचा, या सर्व गोष्टीचा गैरवापर करत अपहरणाची खोटी केस दाखल करून घेतली...

-