मंत्र्यांचा आश्रमशाळेत मुक्कामाचा फतवा; राज्य आयुक्त खासगी शाळेत:‘संवाद चिमुकल्यांशी’ उपक्रमात नाशिकला सत्य उघड
आदिवासी विकासमंत्र्यांच्या आदेशानुसार, या विभागाच्या राज्य आयुक्त नयना गुंडे आश्रमशाळा व वसतिगृह पाहणीसाठी खास मुक्कामासाठी सुरगाण्यातील डोल्हारे येथे मोठ्या लगबगीने गेल्या खऱ्या. मात्र, तेथील स्थिती पाहून त्या तिथे थांबू शकल्या नाहीत. अखेर त्यांना आपला मुक्काम आंबाठा येथील एका खासगी विद्यालयात करण्याची वेळ आली. एवढे होऊनही सकाळी त्यांनी येथील कामकाज योग्य चालू असल्याचा अभिप्राय दिला. मात्र, असुविधांबाबत सविस्तर अहवाल आल्यावर निर्णय...