परीक्षा ८ दिवसांवर, तरी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनेच वेळापत्रक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा दोनवेळा पुढे ढकलली गेली. नव्या वेळापत्रकानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेचे बदललेले वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असल्याचे अधिकारी सांगत आहेत, पण अजूनही नवे वेळापत्रक त्यावर दिसत नाही.