वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला इन्स्टाग्रामवर केले अनफॉलो:सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवा; दावा- दोघेही वेगळे राहत आहेत
भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर वाढल्या आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कुटुंबातील जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दोघे अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि घटस्फोटाची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. आर्यवीरचा जन्म 2007 आणि वेदांतचा 2010 मध्ये झाला. सेहवागने पत्नीचा नाही तर...