माजी बॅटिंग कोचने केले रोहितचे कौतुक:विक्रम राठोड म्हणाले- रोहित सर्व काही विसरू शकतो, पण गेमप्लॅन नाही
टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, रोहित शर्मा सर्व काही विसरू शकतो, पण गेमप्लॅन कधीच नाही. यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर राठोड यांचा कार्यकाळ संपला. माजी क्रिकेटपटू तरुवर कोहलीसोबतच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा केली. पॉडकास्टमध्ये रोहितच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या गुणांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्याच्या काही उणिवाही सांगितल्या....