चित्रा वाघ,स्मृती इराणी बिलकिस बानो प्रकरणी गप्प का? राष्ट्रवादी महिला आघाडीचा थेट सवाल

 

सोलापूर : गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरात राज्यात जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता.ती गरोदर असताना त्यावर असा सामूहिक अत्याचार झाला होता.कोर्टाने या प्रकरणात अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.पण गुजरात सरकारने यांची शिक्षा माफ करून त्यांना मुक्त केले आहे.एका महिलेवर अत्याचार झाला की,भाजपच्या चित्रा वाघ,स्मृती इराणी या आवाज उठवत असतात.आता त्या गप्प का आहेत.असा सवाल करत सोलापूर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

भाजपमधील महिला नेत्या गप्प का ?
सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदेले यांनी भाजप पक्षात असलेल्या महिला नेत्या महिलांवर अत्याचार होताना आवाज उठवत असतात. पण, बिलकिस बानोवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची मुक्तता केल्यावर या गप्प का आहेत, असा सवाल केंद्रातील व गुजरातमधील भाजपा सरकारला चंदेले यांनी केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ,स्मृती इराणी यांनी आवाज उठवावा आणि त्या नराधमांना पुन्हा जेल मध्ये पाठवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

गुजरात मधील बिलकिस बानो या महिलेवर ती गरोदर असताना २००२ साली सामूहिक अत्याचार झाला होता. त्यांच्या नातेवाईकांची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाने संबंधित दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती. पण, काही दिवसांपूर्वी या सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली होती. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीनं औरंगाबादमध्ये निदर्शनं करण्यात आली.

 

बिलकिस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेप्रकरणी काँग्रेस आणि देशभरातील विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी देखील गुजरात सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयाचा राग येतो, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोषींचं स्वागत, सत्कार करणं योग्य नाही, असं म्हटलं होतं.

Leave a Comment

Your email address will not be published.