CM शिंदेंची नाशिकमध्ये मोठी खेळी:अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरुद्ध अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरने पाठवले एबी फॉर्म
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. बंडोबांना थंड करण्याचे प्रस्थापितांसमोर आव्हान आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जवळपास 5 जागांवर आपापले उमेदवार दिलेले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांविरुद्ध हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांसाठी अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरद्वारे एबी फॉर्म पाठवले आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात पक्षांमध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष शिंदे यांच्या शिवसेनेने देवळाली मध्ये राजश्री आहिराव यांना तर, दिंडोरीत धनराज महाले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या खेळीने अजित पवारांच्या उमेदवारांची कोंडी होताना दिसत आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरोज अहिरे तर दिंडोरीमधून झिरवाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर हेलिकॉप्टरने एबी फॉर्म घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आज शेवटच्या दिवशी वेळेत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ झाली. अर्ज भरण्यासाठी एक तास बाकी असताना नाशिकमध्ये शिंदे गटाने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. हेलिकॉप्टरने पाठवण्यात आलेल्या या एबी फॉर्मची राजकीस वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. हे ही वाचा… अजित पवारांनी बिनकामी माझे सरकार पाडले:माझ्या कार्यकाळात 70 हजार कोटींचा घोटाळा झाला नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा सिंचन घोटाळा अजित पवारांची पाठ सोडत नाही, अशी मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माझ्या कार्यकाळात कधीही 70 हजार कोटींचा घोटाळा झाला नाही. माझ्या कार्यकाळात सिंचन खात्याला सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश देताना 70 हजार कोटींचा घोटाळा शब्द वापरला नव्हता, असेही ते म्हणाले. अजित पवारांनी माझे सरकार पाडले, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… काँग्रेसने उमेदवारी देऊनही अखेरपर्यंत एबी फॉर्मच दिला नाही:दिलीप माने यांनी भरला अपक्ष अर्ज, सर्व काही फिक्स असल्याचा केला आरोप सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली असतानाही त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यामागे काँग्रेसकडून शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज दिला गेला नसल्याचे कारण समोर आले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पण काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करुनही आज अखेरपर्यंत एबी फॉर्म न भेटल्याने आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिलीप माने यांनी सांगितले. पूर्ण बातमी वाचा…