धनगरांची लोकसंख्या एक काेटीवर, तरी केवळ 1 आमदार:72 ते 75 मतदारसंघांमध्ये विखुरला आहे समाज, यंदा फक्त9 जण निवडणूक रिंगणात

मराठा समाजानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची तब्बल १.०५ कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे. राज्याच्या लोकसंख्येचा ८-९% हिस्सा असणारा हा समाज प्रामुख्याने १७ ते १८ जिल्ह्यांतील ७२ ते ७५ मतदारसंघात विखुरलेला आहे. २०१४ च्या विधानसभेत धनगर समाजाचे ५, तर २०१९ मध्ये केवळ १ आमदार राहिला. यंदा निवडणुकीच्या तोंडावर धनगरांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. मात्र, महायुती किंवा मविआने त्याची फारशी दखल न घेता धनगर समाजाचे अनुक्रमे ३ आणि ६ असे केवळ ९ उमेदवार उभे केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेला धनगर समाज मविआसोबत राहिल्याचा अंदाज आहे. धनगर समाजाला ओबीसीऐवजी अनुसूचित जमातीतून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन ४ महिने पुन्हा धगधगत होते. त्याची दखल न घेतल्याने समाज महायुतीवर नाराज असल्याचे बोलले जाते. धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली, अकोला जिल्ह्यात आहे. त्यानंतर परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आहेत. भाजप : दोन्ही उमेदवार विधान परिषदेचे आमदार महायुती : ४ (शिंदेसेनेचा एकही धनगर उमेदवार नाही) कर्जत राम शिंदे, भाजप जत गोपीचंद पडळकर, भाजप इंदापूर दत्तात्रय भरणे अजित पवार गट १८ जिल्ह्यांत धनगर प्रभावी 1. अहिल्यानगर : नेवासा संगमनेर राहाता 2. सोलापूर : सांगोला पंढरपूर करमाळा माळशिरस 3. सातारा : खानापूर-आटपाडी फलटण माण-खटाव 4. पुणे : इंदापूर बारामती जुन्नर 5. नाशिक : मालेगाव येवला 6. सांगली : आटपाडी कवठेमहांकाळ 7. कोल्हापूर : शिरोळ आजरा गडहिंग्लज 8. बीड : आष्टी पाटोदा 9. संभाजीनगर : वैजापूर कन्नड 10. लातूर : उदगीर औसा लातूर ग्रामीण 11. परभणी : गंगाखेड परभणी ग्रामीण 12. धाराशिव : कळंब परंडा भूम 13. जालना : बदनापूर घनसावंगी 14. धुळे : साक्री शिरपूर 15. नंदुरबार : नवापूर अक्कलकुवा 16. सातारा : कराड वाई 17. नांदेड : किनवट देगलूर 18. रायगड : महाड माणगाव महाविकास आघाडी : ६ करमाळा नारायण पाटील, शरद पवार गट
माळशिरस उत्तमराव जानकर, शरद पवार गट
सोलापूर म. चेतन नरोटे काँग्रेस
औरंगाबाद पू. लहू शेवाळे, काँग्रेस
धुळे अनिल गोटे, उद्धवसेना
सांगोला बाबासाहेब देशमुख, शेकाप १० वर्षांत पाचवरून एकवर २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये धनगर समाजाचे भाजपचे प्रा. राम शिंदे, शिवसंग्रामचे अनिल गोटे, शिवसेनेचे नारायण पाटील, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, शेकापचे गणपतराव देशमुख असे ५ आमदार होते. २०१९ मध्ये गोटे बाहेर पडले. शिंदेंचा पराभव झाला. पाटील यांचे तिकीट कापले. वय जास्त झाल्याने गणपतराव देशमुख यांच्या जागी सांगोल्यातून त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली. मात्र, पराभूत झाले. दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले धनगर समाजाचे एकमेव प्रतिनिधी राहिले.

Share

-