दिव्य मराठी अपडेट्स:टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने छापेमारी; ज्वेलरी देखील जप्त
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने छापेमारी; ज्वेलरी देखील जप्त मुंबई – गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून मुंबई आणि उपनगरातील सुमारे 3 लाख लोकांना कोट्यावधी रुपयांना चुना लावल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत छापेमारी सुरु केली आहे. टोरेस या कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वर्षांत दुप्पट, 7 वर्षांत तीनपट आणि 10 वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते. या कंपनीच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. या सर्व शाखांवर ही छापेमारी करण्यात आली. यात कंपनीतील सर्व ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी मुंबई – महापौर बंगल्याच्या आवारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. त्याची पाहणी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी केली. जानेवारी 2026 पर्यंत स्मारक पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्धव यांनी भाजप, मोदी, एकनाथ शिंदेंवर नेहमीप्रमाणे खालच्या पातळीवरील टीका करणे टाळले. या स्मारकाचे भूमिपूजन झाले तेव्हा जे कुणी उपस्थित होते त्यांना, सरकारला तुम्ही आता इथे येण्यासाठी आमंत्रित करू इच्छिता का? असं विचारलं असता ते म्हणाले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेले नाहीत असे सगळे आजही या ठिकाणी येऊ शकतात. स्मारकाचे उद्घाटन करताना जे सरकार असेल त्यांना श्रेय जाईल. मी सरकार बदलणार, असं काहीही म्हटलं नाही. विशाळगडावर उद्या उरूस होऊ देणार नाही : मंत्री राणे मुंबई – सहा महिन्यांपूर्वी म्हणजे 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर हिंदू-मुस्लिमांमध्ये जोरदार हिंसाचार उसळला होता. त्यावरून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर वातावरण शांत होत असताना विशाळगडावर 12 जानेवारी रोजी उरूस होऊ देणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे गडावरील अतिक्रमणांवरून दोन गटात जोरदार वाद उफाळला होता. त्याचे पर्यवसान दगडफेक, जाळपोळीत झाले होते. मराठी तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व्हावे : शरद पवार सातारा – जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून जागतिक संमेलनाचे उद्घाटन आणि त्या माध्यमातून मराठी मनाचा शोध हा उपक्रम एका वेगळ्या जाणिवांचा आहे. संमेलने ही साहित्यिकांची नसतात, तर ती विचारांची आदान प्रदान केंद्रे ठरावीत. तसेच तंत्रस्नेही समाज देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उन्नत बिंदूवर नेऊन ठेवू शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पवार बोलत होते. परळीत मुंडे गँगकडूनबूथ कॅप्चरिंग : आव्हाड बीड – शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीधनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभानिवडणुकीत परळीतील मतदान केंद्रावर मतदारांनाबोटाला शाई लावून बाहेर पाठवले जायचे. त्यानंतर बूथकॅप्चरिंग करून मुंडे गँग ईव्हीएमचे बटण दाबायची, असाआरोप आव्हाड यांनी केला, याबाबत त्यांनी एक व्हिडिओपोस्ट केला. व्हिडिओत एक व्यक्ती ईव्हीएमवर धनंजय मुंडे यांनामतदान करताना दिसत असून, मतदान केंद्र ताब्यात घेऊनचित्रिकरण केल्याचा दावा व्हिडिओ शेअर करणारेगजाभाऊ नावाच्या व्यक्तीने केला आहे. परळीमतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यातआले. मतदारांच्या बोटांना शाई लावायची आणि बाहेरपाठवयाचे. मतदान केंद्राच्या आतमध्ये बटण दाबण्याचेकाम ही गँग करायची, असे आव्हाड यांनी नमूद केले. लातूरला आजपासून राज्यस्तरीय अधिवेशन लातूर – ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वाराआयोजित महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकमहासंघ (फेस्कॉम) चे 34 वेराज्यस्तरीय अधिवेशन लातूर येथेदि. 11 व 12 जानेवारी रोजीआयोजित करण्यात आलेआहे,अशी माहिती फेस्कॉमचेअध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीदिली. उद्घाटन उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. 34 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचीजय्यत तयारी दिवाणजी व श्याममंगल कार्यालय सावेवाडी येथेकरण्यात आली आहे. या नगरीसकै. गुरुशांतप्पा नागप्पा लातूरेसभागृह असेल नाव देण्यात आलेआहे. आज सकाळी 8 ते 9.30 यावेळेमध्ये शोभायात्रा काढण्यातयेणार आहे. ही शोभायात्रा गांधीपुतळा ते मुख्य रस्त्यावरून फिरूनअशोक हॉटेल मार्गे दिवाणजी मंगलकार्यालय येथे विसर्जित होईल. सावेडीमध्ये आज रंगणार संगीत मैफल अहिल्यानगर – आंतरराष्ट्रीयगायक पवन श्रीकांत नाईक निर्मितव नादब्रम्ह संगीतालयाच्या संयुक्तविद्यमाने सावेडीत शनिवारीसायंकाळी 6 वाजता ‘देव भक्तीचाभुकेला’ या संगीत मैफलीचेआयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मराठी अभंग, भक्तीगीत,गवळण, भारूड, पोतराज इ.गीतांची बहारदार मैफल रंगणारआहे. ही मैफल सायंकाळी 6वाजता भिडे हॉस्पिटल चौकाजवळशुभमंगल कार्यालयात होणार आहे.रसिकांनी या मैफिलीला मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे, असेआवाहन करण्यात आले आहे.श्रेयस शित्रे, पवन तळेकर, संकेतगांधी, कल्याण मुरकुटे आदीसहगायन करणार आहेत. तरशेखर दरवडे हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. मुंबईच्या भक्ताकडून साईंना 60 ग्रॅमचा 4.29 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण शिर्डी – नवी मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने श्री साईचरणी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्णमुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत 4 लाख 29 हजार रुपये आहे. हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्णमुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्रीसाईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी राघव नरसालय यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. ऑनलाइन नायलॉन मांजा विक्री; कारवाई करा : गोऱ्हे मुंबई – नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरिक जखमी झाले तर काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणली आहे. तरीही ऑनलाइन विक्री केली जात आहे. अशा ठिकाणी सक्त कारवाई करण्यात यावी. तसेच नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, जळगांव, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक कारवाईबाबत ऑनलाइन बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केेले. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी चांगल्या संकल्पना राबवल्या आहेत. भुसावळात चहा पिण्यास आलेल्या तरुणास चार जणांनी घातल्या गोळ्या भुसावळ – शहरातील जाम माेहल्ला चाैकातील चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी आलेल्या तरुणावर दुचाकीने आलेल्या चार संशयितांनी गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पूर्ववैमनस्यातून सिनेस्टाइल हा थरार घडला. 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अफाफ पटेल याच्या खुनात हा तरुण संशयित आरोपी होता. त्यामुळे मित्राच्या खुनाचा बदला खुनाने घेतल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. तेहरीन नाशिर शेख (27, रा. मच्छी मार्केट, भुसावळ) असे या मृताचे नाव आहे. अफाफ पटेल याच्या खून प्रकरणात तेहरीन हा जामिनावर होता. शुक्रवारी तो सकाळी सात वाजेच्या सुमारास चहा पिण्यासाठी जाममाेहल्ला चाैकातील डीडी टी हाऊस या चहा व कोल्ड्रिंक्सच्या दुकानावर आला हाेता. ताे दुकानात जाऊन बसला. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या चार संशयितांनी 7.19 वाजता तेहरीनवर गाेळीबार केला. त्यामुळे तेहरीन रक्ताच्या थाराेळ्यात पडला हाेता. त्याच्या मानेवर दाेन गाेळ्या, पाेटात एक गाेळी लागली हाेती.अगदी सिनेस्टाइल पद्धतीने मारेकऱ्यांनी दुकानाबाहेर येऊन दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. तेहरीनला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. सावरकरांचा अवमान; राहुल गांंधींना जामीन पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अवमाकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे येथील विशेष न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला अाहे. राहुल यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीवर न्यायालयात हजेरी लावली. त्यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात अाल्याची माहिती त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली. मार्च 2023 मध्ये लंडन येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून सावकरांचे पणतू सात्यकी यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होईल. विवाहितेचा छळ; दोघांवर परभणीत गुन्हा दाखल परभणी – तुझ्या आई-वडिलांकडूनमोटारसायकल घेऊन ये, असे म्हणतविवाहितेचा छळ करण्यात आला.याप्रकरणी सासरच्या मंडळीवर 9जानेवारी रोजी कोतवाली पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. शाजिया शेख याविवाहितेने तक्रार दिली आहे.लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवसचांगले नांदविल्यावर सासरच्यामंडळींनी लहान सहान कारणानेविवाहितेस त्रास देण्यास सुरुवातकेली. भांडे बासण, मोटारसायकल घेऊन ये, असे म्हणत उपाशीपोटीठेवून शारीरिक, मानसिक त्रास दिला.लोखंडी रॉडने मारुन विवाहितेलाजखमी केले. जखमी विवाहितेलाउपचारासाठी रुग्णालयात दाखलकरण्यात आले. उपचारानंतर विवाहितेने रफीक शेख, सीमा शेखया दोघांवर गुन्हा दाखल केला. महिलेचा खून, आरोपीची बदनापुरात आत्महत्या करमाड – करमाड येथील डीएमआयसीजवळच असलेल्या लहुकीफाट्याजवळ गुरुवारी (दि.9) रोजीरात्री साडेआठ वाजता 35 वर्षीयअनोळखी महिलेचा मृतदेहआढळला होता. महिलेची ओळखपटली असून सुनीता कृष्णा घनघाव(35, रा. झाल्टा, ता. छत्रपतीसंभाजीनगर, ह. मु. मुकुंदवाडी)असे महिलेचे नाव आहे. तरमहिलेचा खून करून फरार झालेलाआरोपी रावसाहेब तान्हाजी ओळेकर(25,रा. तळणी, ता. बदनापूर, जि.जालना. ह. मु. शेंद्रा) यानेही बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वीपासून रावसाहेब वसुनीताचे अनैतिक संबंध होते.सुनीता हिने रावसाहेब याच्याकडेलग्न करण्यासाठी तगादा लावलाहोता, परंतु तो लग्न करण्यासाठीटाळत आहे, असे सुनीता हिच्यालक्षात आल्यानंतर तिने दीड वर्षांपूर्वीमुकुंदवाडी पोलिस ठाण्यातबलात्काराचा गुन्हा दाखल केलाहोता. जेलमधून राहून आल्यानंतरत्याने पुन्हा सुनीताशी जवळीककरून येणे-जाणे सुरू केले होते.दरम्यान, रावसाहेब याने दीडवर्षापूर्वी सातारा परिसरात एकामंदिरात लग्न केले होते, परंतु तोतिला घरी घेऊन जाण्यास नकार देतहोता. सुनीता हिला तीन मुलेअसल्याने त्या मुलांचे काय करायचेयातून त्या दोघात वाद होता.त्यातूनच ही घटना घडली. धुळ्यात साठ हजार पगार असलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्यास 400 रुपयांची लाच घेताना अटक धुळे – शिरपूर-वरवाडे येथील एकाकडून 400 रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शुक्रवारी रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. जितेंद्र धोबी असे लाचखोराचे नाव आहे. त्याला 60 हजार रुपये पगार आहे. वरवाडे येथील एका नागरिकाने घराचे बांधकाम सुरू केले आहे. या ठिकाणी एक वायर अडसर ठरत होती. त्यामुळे या नागरिकाने शिरपूर येथील वीज वितरण कंपनीकडे ही वायर हटवण्यासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी धोबीने 400 रुपयांच्या लाच घेतली. नदी जाेड प्रकल्पासाठीनिधी उपलब्ध करून द्या; मंत्री विखेंची केंद्रीय गृहमंत्री शाहांकडे मागणी शिर्डी – केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितशाह यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्णविखे पाटील यांची सदिच्छा भेटघेतली. राज्यात नव्याने स्थापनझालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर विखेपाटील यांची पहिलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीगसुविधा तातडीने सुरू करण्याचीतसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधीउपलब्ध करून देण्याची विनंती मंत्रीविखे पाटील यांनी केली. डॉ. सुजयविखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते. मागील अडीच वर्षात महायुतीसरकारने सामान्य नागरिकांसाठीयशस्वीपणे राबवलेल्या योजनांनाजनतेचे मोठे पाठबळ मिळालेअसल्याचे सांगतानाच महसूल वदुग्ध व्यवसाय विकास विभागानेघेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय वकार्यान्वित झालेल्या योजनांचीमाहीती मंत्री विखे पाटील यांनी भेटीतझालेल्या चर्चे दरम्यान दिली.विधानसभा निवडणुकीत महायुतीलामिळालेले यश व जिल्ह्यातील दहामतदारसंघातील मिळालेल्या यशाच्यापार्श्वभूमीवर मंत्री अमित शहा आणिराधाकृष्ण विखे यांच्यात चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ. सुजय विखेउपस्थित होते. पुन्हा मंत्री पदाची संधीदिल्याबद्दल विखे यांनी केंद्रीय मंत्रीशाहर यांचे आभार मानले. रुपयाची विक्रमी घसरण; एक डाॅलर 86.04 रुपये मुंबई – अमेरिकी डाॅलरच्या तुलनेत रुपयात प्रचंड घसरण झाली. शुक्रवारी रुपयाचे मूल्य 18 पैशांनी घसरून पहिल्यांदाच ते प्रती डाॅलर 86.04 रुपयांवर गेले. अमेरिकन डाॅलरची मजबूत स्थिती व परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय चलनावर दबाव आहे. या घसरणीचा परिणाम देशाचे बजेट आणि गुंतवणुकीवर होणार आहे. यामध्ये आयात करण्यात येणारे सामान, कच्चा माल, सुटे भाग आदींचा समावेश आहे. प्राध्यापकांच्या वैद्यकीय रजांवर यूजीसीचा अंकुश नाशिक – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राध्यापकांच्या वैद्यकीय रजेवर अंकुश आणला जाणार आहे. आजारपणाच्या नावाखाली अल्पावधीत कोणी रजा मागितली तर त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शारीरिक तपासणीसाठी पाठवले जाईल. नंतरच सुटी देण्यात येणार आहे. प्राध्यापक रजेवर हक्क म्हणून दावा करू शकणार नाहीत. यूजीसीने ‘यूजीसी रेग्युलेशन 2025’च्या मसुद्यासह प्रथमच मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यामध्ये प्रथमच शिक्षकांसाठी पाच मुद्द्यांवर सर्वसाधारण कर्तव्येही नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये प्राध्यापकांच्या वैद्यकीय रजांसह इतर सुट्यांवरदेखील मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, या मसुद्यामुळे देशभरातील प्राध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वैद्यकीय रजेच्या नावाखाली वारंवार रजेवर जाणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई होणार आहे.