एकनाथ शिंदे-माझ्याही बॅगा तपासल्या गेल्या:अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर रवी राणांवर ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत केली टीका

लोकांना फार नकारात्मक बोललेले आवडत नाही. जनता फार सकारात्मक विचार करत असते. आम्ही देखील एकेकाळे राणांचे समर्थन केले आहे. पण राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव करून घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांनी आता तरी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात देखील उमेदवार दिला आहे. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना समजून सांगायला हवे, अशा शब्दात अजित पवारांनी राणांवर निशाणा साधला. रवी राणांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा हे काहीही बोलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांनी समजून सांगायला हवे आणि महायुतीत अंतर पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे. त्यांनी आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात देखील वक्तव्य केले होते. जनेतला नकारात्मक बोललेले आवडत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि माझ्या देखील बॅगा तपासल्या परभणी मध्ये माझ्या देखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील बाग्या तपासल्या गेल्या होत्या. मात्र, अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी तक्रार करणे, आरोप करणे हे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या माध्यमातून असे होत असल्याचा आरोप विरोधक करत असतील तर आमच्या सोबत असणाऱ्या पोलिसांच्या देखील बॅगा तपासा, असे आवाहन देखील त्यांनी केले. विरोधकांच्या आरोपाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उमेदवारी देताना आम्ही सोशल इंजिनिअरिंग पाळले आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आमची भूमिका मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. उमेदवारी देताना आम्ही सोशल इंजिनिअरिंग पाळले असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. मी साडेबारा टक्के आदिवासी, साडेबारा टक्के मागासवर्गीय आणि साडेबारा टक्के महिलांना उमेदवारी दिली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. आम्ही निवडून आलो तर आम्ही सर्वांगिन विकास करू, असे प्रत्येक जण सांगतो. मात्र, मी बारामती मतदारसंघांमध्ये ते करून दाखवले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. वाचाळविरांनाही अजित पवारांचा सल्ला महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकवला आहे. त्याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवे. प्रत्येकाने सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षांचा आदर ठेवला पाहिजे. सर्वांना रिस्पेक्ट द्यायला हवा, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. जे समाज मान्य करणार नाही, जे सुसंस्कृतपणामध्ये बसत नाही, अशा प्रकारचे वागणे प्रत्येकाचे नसावे, असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळविरांना सल्ला दिला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपला:त्यामुळे भाजपने देव फिरवला; रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? ठाकरे गटाचा निशाणा राममंदिराचे राजकारणच चालत नाही म्हटल्यावर मोदी–शहांच्या तोंडून रामनाम येणेही बंद झाले. लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपल्याचा परिणाम असा झाला की, राममंदिराचे काम रखडून पडले. मोदी साहेबांनी देव बदलला. त्यामुळे भाजपने देव फिरवला. श्रीराम पुन्हा वनवासी होतात की काय, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली. रामाची निवास व्यवस्था अपुरी आहे. रामाचे छत गळते आहे व घराला कुंपण नाही. दरबाराचे कामही अपूर्ण. त्यामुळे रामाची अवस्था अवघडल्यासारखी झाली. दिल्लीच्या राजाने देव बदलल्याचा फटका अयोध्येच्या राजाला बसला. भाजपला आता श्रीराम नकोसे झाले! रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या बाबत ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून भाजपवर आणि मोदींवर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण’ निघून गेला, आता फक्त ‘खान’ उरला:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा… उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावे:संजय राऊत यांचा निशाणा; गुजराती व्यापाऱ्यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी भान ठेवावे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे गुजरामधील दोन व्यापाऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांच्यावर राज ठाकरे हे टीका करर असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष पणे वागत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. पूर्ण बातमी वाचा…

Share