न्यूझीलंडच्या बोवेसचे लिस्ट-एमध्ये सर्वात जलद द्विशतक:103 चेंडूत पूर्ण केली डबल सेंच्युरी; ट्रॅव्हिस हेड आणि एन. जगदीसन यांचा विक्रम मोडला
न्यूझीलंडचा फलंदाज चाड बोवेस लिस्ट ए मध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत फोर्ड कप स्पर्धेत कँटरबरी किंग्जकडून खेळणाऱ्या चाड बोवेसने ओटागो व्होल्ट्सविरुद्धच्या सामन्यात 103 चेंडूंत द्विशतक झळकावले. त्याने 110 चेंडूंचा सामना करत 205 धावा केल्या.
त्याच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि भारतीय फलंदाज एन जगदीसन यांच्या नावावर होता. दोघांनी 114 चेंडूत द्विशतक ठोकले आहे. फोर्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावले
फोर्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावले. चॅड बोवेसच्या आधी, जेमी हाऊने 2012-13 मध्ये सेंट्रल स्टॅगसाठी 222 धावा केल्या होत्या. बोवेसने केवळ 53 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले
बोवेसने अवघ्या 53 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. स्पर्धेच्या इतिहासातील हे पाच जलद शतकांपैकी एक आहे. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरच्या नावावर आहे. त्याने 2021/22 मध्ये सेंट्रल स्टॅगसाठी 49 चेंडूत शतक झळकावले होते.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या बोवेसने 2015 मध्ये न्यूझीलंडला जाण्यापूर्वी प्रोटीज अंडर-19 संघासोबत कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आणि त्या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.