किरकोळ कारणावरून भांडण, चौघांविरुद्ध गुन्हा:जामखेडातील घटना, कोयता, काठीने मारहाण

एक दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये शाब्दिक वाद झाला, याचा राग मनात धरून चार जणांनी एका पान शॉपसमोर कोयता व काठीने जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार झाले असून ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिसात किरण चंद्रकांत खेत्रे (वय २८, रा. खर्डा रोड, बेल्हेकर वस्ती) यांनी फिर्याद दिली. २५ रोजी नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये अदनान ऊर्फ आद्या शेख याच्या बरोबर शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून २६ नोव्हेंबर रोजी आठ वाजता हिरा मोती पान सेंटरसमोर फिर्यादी किरण खेत्रे व त्याचे मित्र महेश येवले व धम्मसागर समुद्र हे बोलत असताना आरोपी कुणाल बंडू पवार, अदनान ऊर्फ अद्या शेख, सुरज साळुंखे, सुमित ओहळ, सर्व. रा. तपनेश्वर रोड, जामखेड येथे कोयता व हतात काठ्या घेऊन आले होते. आरोपी अदनान शेख याने त्याचे हतातील कोयता फिर्यादी किरण खेत्रे यास जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात उजव्या बाजुस मारून दुखापत केली. आरोपी कुणाल पवार, सुरज साळुंखे व सुमित ओहळ यांनी त्यांचे हातातील काठीने फिर्यादीस व त्याचे मित्र महेश येवले आणि धम्मसागर समुद्र यांना देखील मारहाण करून दुखापत व शिवीगाळ दमदाटी केली. अशी फिर्याद दाखल झाली यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी फरार आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

Share

-