सरकार महायुतीचे, मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठी ठरवतील:मोदी, शाह, नड्डा यांना भौगोलिक महत्व व जातीय बॅलन्स कळतो – चंद्रकांत पाटील

राज्यात महायुतीचे सरकार येणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मोदी व शाह हेच घेतील अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. महायुतीच्या चिन्हवार आलेल्या १६० जागा येतील. काही सर्व्हे २२५ दाखवत आहे. ती अतिशयोक्ती ठरेल. पण १६० जागा निवडून येईल. आणि अन्य अपक्ष मित्रपक्ष या बोनस जागा असतील असे पाटील यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह व जेपी नड्डा यांना भौगोलिक महत्व व जातीय बॅलन्स कळतो. प्रत्येकाची क्षमता त्यांना माहित असते. ते योग्य तेच ठरवतात. अजित पवार, एकनाथ शिंदे यांना मोदींवर विश्वास आहे. जास्त आमदार असणाऱ्याचा मुख्यमंत्री करायचा की अन्य कुठल्या निकषावर द्यायचे हे नेतृत्व ठरवेल असे पाटील यांनी स्पष्ट केले. सर्वे करणाऱ्या कंपन्यांपेक्षा सर्वात मोठी यंत्रणा आमच्याकडे आहे. त्यात आमची १ लाख ७ हजार बुथवार माणसे आहे. संध्याकाळी कॉलिंग एजंट एक चार्ट तयार करतो. नेत्यांनी त्याचे विश्लेषण केले. तो अंदाज खरा आहे. त्यात संपूर्ण महाराष्ट्रात १६० जागा दाखवलेल्या आहे. हे ही वाचा… महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्र्यांची खुर्ची’ बंडखोरांच्या हाती:भाजप महायुतीच्या 31 जागांवर थेट इम्पॅक्ट; समजून घ्या शिंदे-अजितदादांची आतली खेळी पोल ऑफ पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीचे (भाजप महायुतीचे) सरकार स्थापन होणार आहे. 11 एजन्सीचे एक्झिट पोल महायुतीला सरासरी 146 जागा देत आहेत. महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा असून बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. म्हणजे भाजप आघाडी विजयाच्या जनळवर उभी आहे. सविस्तर वाचा… आम्ही 12 तासांत मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू:विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य, म्हणाले – जो जबाबदारी पेलेल तो कुटुंबप्रमुख कोणी कोणती जबाबदारी पार पाडायचे हे आमचे ठरले आहे. परवा सत्ता स्थापनेचा मंडप दिसेल. 12 तासांत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी राहिल असा मला विश्वास विश्वास नाही, तर खात्री आहे. आणि महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. सविस्तर वाचा… महाराष्ट्राचे पहिले CM वीर नरिमन होणार होते:पण गुजराती लॉबीने विरोध केला, सरदार पटेलांनी रोखले, नेमके प्रकरण काय? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वीर नरिमन होणार होते, पण तेव्हाच्या गुजराती लॉबीने प्रचंड विरोध केला. त्यामुळे त्यांची ही संधी हुकली, असा दावा सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी केला आहे. बॅरिस्टर नरिमन हे सुभाषचंद्र बोसांचे जिवश्च-कंठश्च मित्र होते. मुंबईतले नरिमन पॉइंट आज त्यांच्यामुळेच अजरामर आहे. सविस्तर वाचा…

Share

-