ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर:अभिमन्यू, हर्षित व नितीश यांना संधी; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 संघही जाहीर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी भारताने 18 सदस्यीय संघात अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरी टेस्ट 6 डिसेंबरपासून टीम इंडिया तब्बल 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये तर दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाईल. टीम इंडियाने 2014 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या काळात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने 2 मालिका जिंकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैस्वाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर. राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अविनाश खान, यश दयाल.