पुण्यात बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले:दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती; हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बावधन परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टर मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळतात पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले तो रहिवासी भाग नसल्याने मोठी दुर्गघटना टळली. हेलिकॉप्टरमध्ये तिघे प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे प्रवासी कोणत्या दिशेने जात होते, याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही. गेल्या महिन्यातही झाला होता अपघात गेल्या महिन्यात 24 ऑगस्ट रोजी देखील पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली होती. मुंबईमधील ग्लोबल या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. यामध्ये पायलटसह तीन प्रवाशी होते. या घटनेचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केली होती. मुंबईतील ग्लोबल कंपनीचे AW 139 या हेलिकॉप्टर होते. या अपघातामध्ये कॅप्टन आनंद यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले धीर भाटिया, अमरदीप सिंग, एसपी राम हे जखमी झाले होते. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हवण्यात आले होते. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गाय आणली:गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-