टच स्क्रीन डिस्प्लेचा JBL चा TWS Earbuds लाँच, पाहा किंमत

 

नवी दिल्लीः JBL ने आपला नवीन TWS Earbuds ला लाँच केले आहे. याचे नाव JBL Tour PRO 2 earbuds आहे. टच स्क्रीन डिस्प्ले सोबत येणारा हा जगातील पहिला वायरलेस इयरबड्स आहे. जेबीएलचा हा इयरबड्स १.४५ इंचाच्या एलईडी डिस्प्ले सोबत येतो. याच्या मदतीने यूजर्सला म्यूझिक कंट्रोल, कस्टमाइज इयरबड्स, रिसीव कॉल, मेसेज आणि सोशल मीडिया नोटिफिकेशन आदीला कंट्रोल्स करता येवू शकते. त्यामुळे तुम्हाला वारंवार स्मार्टफोनला टच करण्याची गरज नाही.

JBL Tour PRO 2 earbuds मध्ये बॅटरी बॅक अप म्हणून ४० तासांपर्यंत टोटल म्यूझिक प्ले टाइम मिळणार आहे. तर इयरबड्सला लागोपाठ १० तासांपर्यंत यूज करता येवू शकते. कंपनीने कॉलिंग दरम्यान जबरदस्त साउंड मिळावा यासाठी ६ माइक डिझाइनचा वापर केला आहे. सोबत यात दमदार साउंड क्वॉलिटी सुद्धा मिळते. याची किंमत जवळपास २० हजार रुपये आहे. याला यूरोप मध्ये कंपनीने लाँच केले आहे. जेबीएलच्या या इयरबड्स मध्ये एएनसीचे फीचर दिले आहे. ज्यात अॅक्टिवेट नॉइस कँसिलेशनचे फीचर्स मिळते. या फीचर्सच्या बदल्यात यूजर्संना गर्दीच्या ठिकाणी जबरदस्त साउंड क्वॉलिटी मिळते.

या इयरबड्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सर्व कॉल रिसिव्ह करता येतात. मेसेज रिसिव्ह करता येतात. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन पाहता येतात. म्हणजेच हे जवळपास स्मार्टवॉच सारखे काम करते. यात एकापेक्षा एक भारी फीचर्स दिले असून यात प्रमुख फीचर्स मध्ये 10mm dynamic drivers, ६ मायक्रोफोन्स आणि अॅक्टिव नॉइस कँसिलेशन सारखे फीचर्स दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.