कबीर बेदींनी सांगितले परवीनसोबतच्या ब्रेकअपचे खरे कारण:अभिनेत्री मानसिक आजाराशी झुंज देत होती, त्यामुळेच मला सोडले

परवीन बाबी अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली होती. तिचे नाव डॅनी डेन्झोंगपा, कबीर बेदी आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशी जोडले गेले. कबीर बेदीसोबत अभिनेत्रीचे नाते फार कमी काळ टिकले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदींनी परवीन बाबीसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की मी नाही तर परवीननेच माझ्यासोबतचे नाते तोडले. तिचे मानसिक आरोग्य चांगले नसल्यामुळे ती मला सोडून गेली. परवीनने नाते संपवले होते – कबीर बेदी
कबीर बेदी यांनी डिजिटल कॉमेंट्रीमध्ये बोलताना सांगितले की, परवीनला भीती होती की जर तिच्यावर वैद्यकीय उपचार झाले तर इंडस्ट्रीतील प्रत्येकाला तिची स्थिती कळेल, ज्यामुळे तिची कारकीर्द देखील संपुष्टात येईल. कबीरने सांगितले की, मला माहीत होते की जर तिने स्वत:वर उपचार केले नाही तर तिची प्रकृती आणखी बिघडेल. कबीरने त्यांच्या आणि परवीनच्या नात्याबद्दल सत्य सांगितले की, तिला सोडणारा मी नाही, तिने मला सोडले. पण लोकांनी मला दोष दिला. माझ्यावर आरोप करण्यात आले की, परवीनला मानसिक आरोग्याचा त्रास होत असल्याने मी तिला सोडले. परवीन बाबी महेश भट्टसोबत लिव्ह इनमध्ये होती
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, डॅनी आणि कबीर बेदीसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर, परवीन बाबी चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. महेश भट्ट आणि परवीन बाबी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. महेश आणि परवीन 1980 मध्ये वेगळे झाले. परवीनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच महेशचे लॉरेन ब्राइटसोबत लग्न झाले होते. आणि एका मुलाचे बापही होते. परवीन बाबीचा मृतदेह घरात आढळून आला
परवीन बाबी या पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डरने त्रस्त होत्या. 2005 मध्ये परवीनचा मृत्यू झाला. ३ दिवसांनंतर त्यांचा मृतदेह घरातून सापडला.

Share