नाशिकच्या कार्यक्रमात खडसे एकटे पडले, नंतर फडणवीसांच्या कानात काय बोलले? चर्चा रंगली

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव संमेलन आज नाशकात मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse ), आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय महानुभाव संमेलनात व्यासपीठावर ( Mahanubhav Panth Sammelan Nashik ) भाजपचे मंत्री तसेच पदाधिकारी उपस्थित असताना चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सुरू होती. व्यासपीठावर खडसे वेगळ्या खुर्चीवर आणि भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसले होते. एकनाथ खडसेंना सगळ्यांनी एकटे पाडले अशी चर्चा कार्यक्रमात रंगली होती. कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी भाषणही केले. भाषण संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात गुप्तगु केली. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितले असेल? यावर उपस्थितांमध्ये मात्र चर्चा रंगू लागल्या होत्या.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू महानुभाव संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महानुभाव पंथाचे अनुयायी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published.