लॅपटॉप चोरणार्‍या उच्चशिक्षितास बेड्या:दोन लॅपटॉप जप्त, बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांचा लॅपटॉप चोरणार्‍या उच्चशिक्षिताला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. प्रितम तुषार भामरे (वय २१ रा. सुखसागरनगर कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र १९ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास बिबवेवाडीतील महाविद्यालय परिसरात बसले होते. त्यावेळी कट्टयावरून चोरट्याने त्यांचा ८२ हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. लॅपटॉप चोरीप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे आणि पोलिस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अशोक येवले यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासले. पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, संजय गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपिरे यांना लॅपटॉप चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी प्रीतम भामरे याला ताब्यात घेतले. ही कामगिरी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर राजा, विशाल जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील अभिषेक धुमाळ यांनी केली. मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर मैत्रिण असलेल्या तरूणीला रस्त्यात आडवून दुसर्‍या सोबत फिरण्यास जाण्याचा तुझा संबंध काय आहे ? अशी विचारणा करून तिला गंभीर मारहाण करून तिचा जबडा फ्रॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर येथील मॉडल कॉलनी येथे घडला. याप्रकरणी रोहन जग्गन्नाथ कदम (27, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदीराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी येथे राहणार्‍या एका 23 वर्षीय तरूणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि आरोपी रोहन कदम हे मित्र मैत्रीण आहेत. त्यांचे दिवाळी पासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. दि. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तरूणी ही त्याच्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवर जात असताना रोहन पाहिले होते. याचवेळी रोहनने तिला थांबवुन तु कोठे चालली आहेत, दुसर्‍या सोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय सबंध आहे ? असे म्हणून त्याने हाताने बुक्यांनी चेहर्‍यावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला.

Share

-