धुमाकूळ! ६ सप्टेंबरला लाँचिंग, त्याआधीच १० लाख लोकांकडून ‘या’ स्मार्टफोनची बुकिंग

 

नवी दिल्लीः huawei mate 50 series to launch : अमेरिकेतील Huawei विरोधातील बंदी घातल्यानंतर कंपनीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी घसरण पाहायला मिळत होती. परंतु, आता असे वाटत आहे की, ब्रँड स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करीत आहे. लोकांच्या मनावर राज्य करणार आहे. कंपनीच्या Mate 50 series स्मार्टफोन्सला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.

Huawei Mate 50 सीरीजच्या स्मार्टफोन्सला चीन मध्ये ६ सप्टेंबर २०२२ रोजी ४ व्हेरियंट्स मध्ये लाँच केले जाणार आहे. परंतु, लाँचिंग आधीच ब्रँडने चीनमध्ये आपल्या अधिकृत वेबसाइटवरून Mate 50 लाइनअपसाठी बुकिंग करणे सुरू केले होते. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे या फोनला आतापर्यंत १० लाखांहून जास्त लोकांनी बुक केले आहे. याचा थेट अर्थ म्हणजे १० लाख लोक या फोनला खरेदी करू पाहत आहेत. म्हणजेच कंपनीकडे अजूनही घरगुती बाजारात लॉयल ग्राहक आहेत. याच कारणामुळे Huawei ला क्वॉलकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoCs चा वापर करण्यासाठी फोर्स करण्यात आले होते. ४जी केवळ स्नॅपड्रॅगन ८ प्लस झेन १ प्रोसेसर हुवावेच्या फ्लॅगशीप मेट ५० सीरीजला पॉवर देईल.

Huawei Mate 50 चे संभावित स्पेसिफिकेशन
Huawei Mate 50 5G स्मार्टफोन डिस्प्ले मध्ये ६.५ इंचाचा इमर्सिव डिस्प्ले सोबत येण्याची शक्यता आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२३७६ पिक्सल असू शकतो. Huawei Mate 50 स्मार्टफोन Kirin 9000S द्वारा संचालित होवू शकतो. जो 8GB RAM संबंधित असेल. फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असू शकतो. ज्यात मेन कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published.