राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याकांना उमेदवारी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चारपैकी तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे युतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘जन सन्मान यात्रे’ला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी 3,000 रुपये मिळतील.” ते म्हणाले की, “मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचे आहे की, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने लढवण्यात येणाऱ्या 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केला होता व्होट जिहादचा उल्लेख विशेष म्हणजे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 14 मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ झाल्याचा दावा केल्यानंतर अल्पसंख्याक समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. या आधी धुळे मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी फडणवीस यांनी ‘व्होट जिहाद’ला जबाबदार धरले होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्व धर्मांवर श्रद्धा ठेवा- अजित पवार आपण सर्व धर्म मानतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आपण छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. यासोबतच पवारांनी समाजातील एका वर्गावर टीका करणाऱ्या भडक नेत्यांच्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली. या माध्यमातून त्यांनी भाजपमधील काही नेत्यांना इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… पुण्यात बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले:दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती; हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील बावधन परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टर मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला. पूर्ण बातमी वाचा… लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाही त्यामुळे आता गाय आणली:गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान, ठाकरे गटाचा हल्ला गाय ही बैलांची माता आहे, पण सरकारचे बापजादे बैल असल्यानेच निवडणुकीसाठी आता गाय आणली आहे. लोकसभा निवडणुकीत ‘बैल’ चालले नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायींना मंचावर आणले आहे. अर्थात, त्यांनी काहीही केले तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता या सरकारला गोठ्यात ढकलणार हे निश्चित आहे. तरीही लोकहो सावधान, गायींना ‘राज्यमाता’ बनविण्याचा निर्णय हे गायींच्या नावाने दंगली घडविण्याचे कारस्थान असू शकते. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. या संदर्भात दैनिक सामनामधून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-