डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज

बॉलिवूडमध्ये सध्या कुणाल रावल आणि अर्पिता मेहताच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नाला मीरा राजपूतने ही हजेरी लावली. यावेळी मीराने व्हाईट साडी परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फेस्टिवल सिजनला तुम्ही देखील असा स्टायलिश लूक करु शकता. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूड पासून जरी लांब असली तरी तिच्या स्टायलिश लूकने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
मिराच्या कुणाल आणि अर्पिताच्या लग्नातील या फोटोवर शाहिद कपूर देखील कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. यावेळी मिराने व्हाईट रंगाची साडी नेसली होती. या साडीवर असलेल्या बारीक नक्षीने सर्वांचे मन मोहून घेतले.
(फोटो सौजन्य : Instagram @mira.kapoor)

​मीराचा स्टायलिश लूक

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बी-टाउनच्या क्यूट कपल पैकी एक मानले जाते. नुकत्याच कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या लग्नामध्ये मीराचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला. यावेळी मीराने व्हाईट साडीची निवड केली होती. दुसरीकडे शाहिद कपूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला. तर डोक्यावर सुंदर असा फेटा देखील लावला होता.

​साडीवरील एम्ब्रॉयडरी

मीराने नेसलेली साडी फॅशन डिझायनर अर्पिता मेहता यांनी स्वतः डिझाइन केली होती. आयव्हरी कलरच्या या साडीवर गोल्ड सिक्विन वर्क दिसत होते. बारीक धाग्यांनी या साडीवर नक्षी करण्यात आली होती. तर साडीच्या काठाला बरीक नक्षी करण्यात आली होती. यासाडीचा पल्लू मीराने एका हातावर सोडला होता.

​नक्षीदार ब्लाऊज

मीराने या साडीसह एक नक्षीदार ब्लाउज घातला होता, ज्यावर बारीक आरश्याने भरतकाम करण्यात आले होते. या साडीवर मीराने क्रॉप डिपनेक ब्लाऊज परिधान केला होता. या स्लीव्हलेस ब्लाऊजच्या रुंद पट्ट्यामुळे मीराच्या लूकमध्ये अजूनच भर पडली होती. यालूक वर मीराने कुंदन मोत्यांचा नेकलेस परिधान केला होता. त्याबरोबर या साडीला साजेल असा मंगटिका देखील लावला होता.

​मेकअप

या लूकला परफेक्ट करण्यासाठी मीराने स्मोकी आय-शॅडो, मस्करा, आणि न्यूड लिपस्टिक लावली होती. त्याच प्रमाणे तिने तिचे सुंदर व्हेवी हेअर मोकळे सोडले होते. मीराचा हा लूक इतका क्यूट दिसत होता की पती शाहिदही स्वतःचे कौतुक थांबवू शकला नाही. मीरासोबतचा फोटो शेअर करत शाहिदने माझ्याशी लग्न करशील का? अशी कॅप्शन दिली आहे.

​​अ‍ॅक्सेसरीज

या सुंदर साडीवर मीराने मोत्याचा हार, पन्ना चोकर नेकलेस आणि मॅचिंग स्टेटमेंट रिंग परिधान केल्या होत्या. या मोत्यांच्या हाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर मीराने हातात घड्याळसुद्धा घातले आहे. या फेस्टिवल सिजनला तुम्ही देखील असा लूक करु शकता.

Leave a Comment

Your email address will not be published.