Mivi ने लाँच केले दमदार साउंड क्वॉलिटीचे Earbuds आणि Neckband, ५० तासांपर्यंत प्लेटाइम, किंमत खूपच कमी

 

नवी दिल्लीः Mivi Duopods A550 :ऑडियो अॅक्सेसरीज बनवणारी भारतीय कंपनी Mivi ने देशात तीन नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या लाइनअप मध्ये ड्युओपोड्स A550, A70 आणि कॉलर क्लासिक प्रो नेकबँड यांचा समावेश आहे. या दोन्ही ड्युओपोड्स मध्ये ब्लूटूथ ५.१ कनेक्टिविटी दिली आहे. कंपनी या सोबत ५० तासांपर्यंत प्लेटाइम देत असल्याचा दावा करते. जाणून घ्या या तिन्ही प्रोडक्ट्सची किंमत आणि फीचर्स संबंधी.

Mivi Duopods A550, F70, Collar Classic Pro ची किंमत
या तिन्ही प्रोडक्ट्सवर १ वर्षाची वॉरंटी दिली आहे. या प्रोडक्ट्सला तुम्ही Mivi ई-स्टोर, अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. ड्युओपोड्स A550 आणि F70 ची किंमत १ हजार ५९९ रुपये आहे. तर कॉलर क्लासिक प्रो नेकबँडला १ हजार १९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. Duopods F70 ला Beige, कोरल, ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये आणले गेले आहे. Mivi Duopods A550 ला चार कलर ब्लॅक, ब्लू, मिंट ग्रीन आणि व्हाइट कलर मध्ये आणले आहे. Collar नेकबँडला पाच कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि ग्रीन आणि रेड या रंगात आहे.

Mivi Duopods A550 आणि Duopods F70 चे फीचर्स
या ईयरबड्स मध्ये 12mm चे ऑडियो ड्राइवर सपोर्ट आहे. बड्स 10 मीटरच्या रेडियसपर्यंत वायरलेस कनेक्ट होऊ शकतात. ईयरबड्स मध्ये USB टाइप-सी पोर्ट सोबत फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. बड्सला १ तासात फुल चार्ज केले जावू शकते. तर १०० टक्के चार्ज झाल्यानंतर हे ५० तास पर्यंत चालू शकते. Duopods A550 आणि Duopods F70 ईयरबड्स मध्ये Environmental नॉइस कँसिलेशन (ENC) सपोर्ट दिला आहे.

Collar Classic PRO चे स्पेसिफिकेशन
Collar Classic PRO नेकबँड मध्ये 190mAh ची बॅटरी मिळते. यात ७२ तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो. नेकबँड मध्ये USB टाइप-सी पोर्टचे फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. नेकबँड मध्ये पेसिव्ह नॉइस कँसिलेशन (ENC) सपोर्ट दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.