डोळ्यादेखत पतीचा पुतण्याने चिरला गळा! पत्नीचा हार्ट ॲटकने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हे प्रकरण पती-पत्नीशी संबंधित आहे. खरं तर, आपल्या 59 वर्षीय पतीचा निर्घृण खून पाहिल्यानंतर, 56 वर्षीय पत्नीचा रविवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मूर्तीराव गोखले आणि शोभा गोखले अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. अनंतपूर वन टाऊन सर्कलचे निरीक्षक रेड्डेप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, … The post डोळ्यादेखत पतीचा पुतण्याने चिरला गळा! पत्नीचा हार्ट ॲटकने मृत्यू appeared first on पुढारी.

Mar 11, 2024 - 22:43
 0
डोळ्यादेखत पतीचा पुतण्याने चिरला गळा! पत्नीचा हार्ट ॲटकने मृत्यू
डोळ्यादेखत पतीचा पुतण्याने चिरला गळा! पत्नीचा हार्ट ॲटकने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हे प्रकरण पती-पत्नीशी संबंधित आहे. खरं तर, आपल्या 59 वर्षीय पतीचा निर्घृण खून पाहिल्यानंतर, 56 वर्षीय पत्नीचा रविवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मूर्तीराव गोखले आणि शोभा गोखले अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. अनंतपूर वन टाऊन सर्कलचे निरीक्षक रेड्डेप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपूरमधील जेएनटीयू कॅम्पससमोरील एलआयसी कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये ही दुःखद घटना घडली.

मूर्तीराव गोखले हे एसके विद्यापीठात अतिथी प्राध्यापक होते. त्यांनी यापूर्वी अनंत लक्ष्मी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य असे मारेकऱ्याचे नाव असून तो मृत मूर्तीराव गोखले यांचा पुतण्या आहे.

अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या आदित्यने एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी गोखले यांना पैसे दिले. मात्र, गोखले हे आपल्या पुतण्याला नोकरी मिळवून देण्यात अयशस्वी झाले. परिणामी आदित्य संतापला. यावरून त्याचा काका गोखले यांच्याशी जोरदार वाद झाला. यादरम्यान, प्राध्यापक गोखले यांच्या पत्नी शोभा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात आदित्यने आपल्या काकांचा गळा धारधार शस्त्राने चिरला. तसेच शरीराच्या अनेक भागांवर वार केले. यावेळी त्याने काकी शोभा यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात प्रा. गोखले यांचा जागीच मृत्यू झाला. तर शोभा यांचा काही वेळाच्या अंतराने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

The post डोळ्यादेखत पतीचा पुतण्याने चिरला गळा! पत्नीचा हार्ट ॲटकने मृत्यू appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow